भारतीय क्रिकेट संघात विकेटकीपर आणि बॅट्समन असलेल्या ऋषभ पंतची मोठी फसवणूक झाली आहे. यामुळे ऋषभ पंतला तब्बल १ कोटी ६३ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी हरियाणाच्या एका खेळाडू विरोधात नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दाखल करण्यागोदरच आरोपी आधीच्या एका फसवणूकी प्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. हरियाणाचा कटीकेटपटू मृणांक सिंह याने ऋषभ पंतला कमी किंमतीत ब्रँडेड घड्याळ खरेदी करून देतो असे आश्वासन दिले होते. याचबरोबर मृणांक ऋषभला आणखी काही वस्तू स्वस्तात खरेदी करून देतो असे म्हणाला होता.

मृणांकने काही मोठमोठ्या क्रिकेटर्सना देखील स्वस्तात वस्तू खरेदी करून दिली होती असा त्याने दावा केला होता. त्यामुळे ऋषभने मृणांकवर विश्वास ठेवला होता. जानेवारी २०२१ मध्ये फ्रॅंक मूलर वेनगार्ड याचिंग सिरीजचे घड्याळ खरेदी करण्यासाठी ऋषभने ३६,२५,१२० रुपये मृणांकला दिले होते. त्यानंतर ऋषभने आणखी एक महागडे घड्याळ आणि काही वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी ऋषभने ६२,६०,००० एवढे रुपये त्याला देऊ केले होते. मृणांकने ऋषभ पंत आणि मॅनेजर सोळंकीला कमी किमतीत घड्याळ देतो असे अश्वासन दिले होते. असे आमिष दाखवून बाऊन्स झालेल्या चेकद्वारे मृणांकने १ कोटी ६३ लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत ऋषभने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मृणांकने याअगोदर असेच एका व्यापाऱ्याला देखील लाखोंचा गंडा घातला होता. त्या व्यापाऱ्याला देखील कमी किमतीत वस्तू खरेदी करून देतो असे म्हणत व्यापाऱ्याला ६ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. त्याप्रकरणी मृणांकला पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले होते.