भारतीय क्रिकेटरचे गर्लफ्रेंड सोबत धुमधडाक्यात झाले लग्न गेल्या वर्षी स्टेडिममध्येच केले होते प्रपोज

भारतीय क्रिकेटर दीपक चाहर नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. काल बुधवारी १ जून २०२२ रोजी दीपक त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे. लग्नाचे खास फोटो शेअर करून त्याने ही बातमी जाहीर केली आहे. आग्रा येथे दीपक चाहर आणि जयाचा मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दिपकने त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आणि क्रिकेट क्षेत्रातील त्याच्या मित्रांना आमंत्रित केले होते. दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांची लव्हस्टोरी तितकीच हटके आहे. जया भारद्वाज ही कार्पोरेट क्षेत्राशी निगडित आहे मात्र दिपकची बहीण मालती चाहर हिच्या मध्यस्तीमुळे या दोघांची भेट घडून आली होती.

पाच ते सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळणाऱ्या दीपक चाहरने सामना संपल्यावर गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला सिनेस्टाईलने प्रपोज केले होते. त्यावेळी दीपक चाहर मिडियामध्यातून जोरदार चर्चेत आला होता शिवाय त्याच्या प्रपोज करण्याच्या स्टाईलवर अनेकजण फिदा झाले होते. या बातमीनंतर दीपक चाहरची बहीण मालती चाहर ही देखील सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसली होती. दीपकची बहीण मालती चाहर ही मॉडेल तसेच बॉलिवूड अभिनेत्री आहे. मालती चाहर हिने तामिळ तसेच बॉलिवूड चित्रपटातून अभिनय साकारला आहे. तमिळ सृष्टीत जाण्याअगोदर जिनिअस या बॉलिवूड चित्रपटात तिने काम केले होते. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या मालतीने काही सौंदर्य स्पर्धा देखील गाजवल्या आहेत. २००९ साली मिस अर्थ आणि २०१४ साली मालती फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग दर्शवला होता. फेमिना मिस इंडियाची ती सेकंड रनरअप ठरली होती. २०१८ साली आयपीएल सामन्यात मालती एक मिस्ट्री गर्ल म्हणून चर्चेत आली होती.

चेन्नई टीमच्या विजयानंतर मालतीने आनंद व्यक्त केला होता त्यावेळी तिचा चेहरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण याचा शोध सुरू झाला. ज्यावेळी ती दीपक चाहरची बहीण असल्याचे समजले त्यावेळी मालतीच्या फॅनफॉलोअर्समध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली होती. मालती आणि जया भारद्वाज यांची अगोदरपासूनच चांगली ओळख होती. तिनेच आपला भाऊ दीपक चाहर आणि जयाची भेट घडवून आणली होती. तर जया भारद्वाजचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज हा देखील एक सेलिब्रिटी आहे. बिग बॉसच्या शोमध्ये त्याने पार्टीसिपेट केले होते. व्हिडीओ जॉकी, मॉडेल आणि अभिनेता अशी त्याची ओळख आहे. एमटीव्ही स्लीट्सव्हीला सिजन २ या रिऍलिटीशोमधून सिद्धार्थ प्रसिद्धीस आला होता. नुकतेच सिध्दार्थने आपल्या बहिणीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून दीपक आणि जयाला शुभेच्छा दिल्या आहेत.