रविवारच्या सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवावा असे प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला वाटत असते. या दिवशी सुट्टी मिळावी म्हणून कलाकारांना आजही झगडावे लागत आहे. असाच काहीसा अनुभव मालिका अभिनेत्रीला आला आहे. खेदाची बाब म्हणजे या कारणास्तव तिला मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी मालिका सृष्टीत आपल्या सजग अभिनयाच्या जोरावर तग धरून असलेली ही अभिनेत्री आहे शुभावी चौकसी. शुभाविने रविवारी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा म्हणून निर्मात्यांकडे सुट्टी मागितली होती. मात्र शुभावीची मागणी धुडकावून लावत या निर्मात्या टीमने तिला मालिकेतून डच्चू दिलेला पाहायला मिळतो आहे.

नुकतेच शुभावीने याबाबत खुलासा केला आहे आणि इंडस्ट्रीतील ही एक कळी बाजू समोर आणण्याचा एक प्रयत्न केला आहे. शुभावीने क्यूँ की सांस भी कभी बहु थी, कासौटी जिंदगी की, कहाणी घर घर की, जस्सी जैसी कोई नहीं, तीन बहुराणीयां अशा गाजलेल्या मालिकेतून तसेच धडक सारख्या बॉलिवूड चित्रपटातून काम केले आहे. मालिकेत काम करत असताना कलाकारांना आठवड्याची सुट्टी मिळायला हवी अशी तिने अनेक निर्मात्यांकडे मागणी केली होती. तिची ही मागणी अनेकांनी मान्य देखील केली होती तर काही निर्मात्यांनी तिला नकार घंटा दाखवली होती. परंतु शुभावीला आता एक लहान मुलगा आहे आणि त्याच्या काळजीपोटी तसेच त्याच्या सोबत आणि नवऱ्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून तिने ही रविवारची सुट्टी मागितली होती. शुभावीने आपल्या करिअरच्या सुरुवातीला रविवारी देखील काम केले होते. निर्मात्या टीमची बाजू मी नेहमीच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्यांच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल पूर्ण जाणीव आहे. ही जाणीव लक्षात घेऊन मी अनेकदा सुट्टी घेणे टाळले होते मात्र आता लहान मुलाची जबाबदारी असल्याने तिला ही सुट्टी मिळणे अत्यंत आवश्यक होते असे ती म्हणते.

मात्र तिच्या या मागणीमुळे मालिकेतून तिला तडकाफडकी काढून टाकणे हे पूर्णपणे चुकीचेच आहे असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. शुभावी गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी मालिका सृष्टीत कार्यरत आहे यात तिने रविवारी सुट्टी मिळावी म्हणून २०१२ सालापासून मागणी केली होती. यात तिला अनेक निर्मात्या टीमकडून खूप चांगला सहयोग मिळाला. आपल्या कारकिर्दीच्या महत्वाच्या टप्प्यावर असतानाच २००७ साली तिने हर्षल चौकसी सोबत लग्नगाठ बांधली होती. तेव्हाच तिला हा अनुभव आला होता. बडे अच्छे लगते है या मालिकेत सध्या शुभावी सक्रिय आहे. या मालिकेत ती नंदिनी कपूरची भूमिका साकारत आहे तर दिशा परमार आणि नकुल मेहता हे या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहेत. आपल्या या खुलश्यामुळे शुभावीने पडद्द्यामागचा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.