Breaking News
Home / जरा हटके / या कारणामुळे अभिनेत्रीला होतोय विनाकारण त्रास कंटाळून आता मोदीजींना केली हि विनंती म्हणाल्या

या कारणामुळे अभिनेत्रीला होतोय विनाकारण त्रास कंटाळून आता मोदीजींना केली हि विनंती म्हणाल्या

अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांचे नृत्यावरील प्रेम सर्वांनाच माहीत आहे. अनेक बॉलिवूड चित्रपट तसेच हिंदी मालिकेतून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नृत्याला आपला प्राण समजणाऱ्या सुधा चंद्रन यांचा १९८१ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अपघात झाला होता या अपघातात त्यांना एक पाय गमवावा लागला होता हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. कृत्रिम पाय बसवून आजही नृत्याची आवड त्या जोपासत आहेत. बहुतेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांच्या वाट्याला महत्वपूर्ण भूमिका आलेल्या आहेत. इतके असूनही नुकतीच एक खेदजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

actress sudha chandran
actress sudha chandran

सुधा चंद्रन यांना जेव्हा कधी विमानाने प्रवास करावा लागतो त्या प्रत्येक वेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कृत्रिम पायाची तिथे तपासणी केली जाते. हा कृत्रीम पाय बसवायला आणि काढायला नेहमी त्रास होतो ही प्रक्रिया खुप वेळखाऊ असल्याने त्यांना नेहमीच हा त्रास जाणवतो. शिवाय कृत्रिम पाय काढताना आणि बसवताना असह्य वेदना होत असतात. सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया त्रासदायक वाटत असल्याने अनेकदा त्यांनी स्फोटक ट्रेस डिटेक्टर वापरण्यास प्राधान्य दिले मात्र त्याचा आजवर कुठलाच फायदा झाला नाही. ही वेदनादायी प्रक्रिया आता असह्य होत आहे असे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. माझा हा व्हिडीओ सरकारपर्यंत पोहोचावा आणि यावर मला योग्य न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. सुधा चंद्रन यांच्या या विनंतीची दखल कोणी घेईल की नाही हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल पण त्यांनी त्यांचे म्हणणे सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. लोकांनी देखील त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करून सहानुभूती दर्शवली आहे. त्यांची विनंती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचल्यास त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार आहे.

actress and dancer sudha chandran
actress and dancer sudha chandran

सुधा चंद्रन ह्या कित्येक दशकापासून कला सृष्टीत आपले स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यास समर्थ ठरल्या आहेत. मयुरी, तेरा इन्तजार, नागीण, कहीं किसी रोज, शका लका बूमबुम, हिना, चष्मे बद्दूर, विष्णू पुराण, तुम बिन जाऊं कहा, जमीन से आसमान तक यासारख्या अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकेतून त्यानी तगड्या भूमिका साकारल्या आहेत. इतकी वर्षे कलासृष्टीला झोकून देणाऱ्या ह्या अभिनेत्रीची दखल घेतली जावी अशी अपेक्षा आता तमाम प्रेक्षक वर्ग त्यांच्या बाजूने करताना दिसत आहे. विमानाने प्रवास करावा लागतो त्या प्रत्येक वेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या कृत्रिम पायाची तिथे तपासणी केली जाते. कृत्रीम पाय बसवायला आणि काढायला नेहमी त्रास होतो याबाबत मोदी सरकारकडून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांची माफक अपेक्षा आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *