हिंदी मालिका अभिनेत्री गुलकी जोशी हिने अभिनेता आणि वादक असलेला तुषार देवल याची नुकतीच माफी मागितली आहे. एक व्हिडिओ शेअर करत तिने ह्या बाबत माहिती दिली आहे. पण हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात. तुषार देवल ह्याने काही दिवसापूर्वी आपल्या सोशिअल मीडियावर अभिनेत्रीमुळे विनाकारण त्रास सहन करत असल्याचं सांगितलं होत. त्याच झालं असं कि हिंदी मालिका अभिनेत्री गुलकी जोशी हिचा युट्युब वर एक मुलाखतीचा व्हिडीओ आहे. या व्हिडिओत cintaa च कार्ड दाखवलं जातंय त्यात तुषार देवलचा मोबाईल नंबर दाखवण्यात आला आहे.

ह्या एका चुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून तुषारला खूप सारे फोन कॉलस येत आहेत. व्हिडिओत जो मोबाईल नंबर देण्यात आला आहे त्यात लोकांनी तो गुलकी जोशीचा नंबर असल्याचे सांगत आहेत. दिवसाला जवळपास १०० फोन कॉलमुळे तुषार खूपच त्रस्त झाला आहे. या बाबत त्याने ही सर्व माहिती गुलकी जोशी यांना कळवली आहे. त्याची दखक घेऊन त्या व्हिडिओत असलेला मोबाईल नंबर ब्लर केला आहे मात्र आतापर्यंत हा व्हिडीओ६ हजार जणांनी पाहिला असल्याने अजूनही तुषारला त्यासंदर्भात फोन कॉलस येत आहेत. दरम्यान घडलेल्या या प्रकाराबद्दल गुलकी जोशी यांनी माझी माफी मागण्याची तसदी सुद्धा घेतली नाही असं तुषार देवल म्हणाला होता. सोशिअल मीडियावर हे प्रकरण चांगलंच गाजलं देखील. त्यामुळे अभिनेत्री गुलकी जोशी हिने एक व्हिडिओ शेअर करत त्यात माझ्याकडून चुकून तुषार ह्यांचा मोबाईल नंबर देण्यात आला असून मिस्टर तुषार देवल याना मी ओळखत देखील नाही कृपया करून तुम्ही त्यांना त्रास देऊ नका असं सांगण्यात आलं आहे. गुलकी जोशी ह्याचा व्हिडिओ तुषार देओल ह्यांनी देखील नुकताच शेअर केला आहे.

तुषार देवल हा संगीत दिग्दर्शक आहे चला हवा येऊ द्या ह्या मंचावर तो संगीताची धुरा सांभाळताना दिसतो यासोबतच कधी कधी तो आपल्या विनोदि अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो संगीत क्षेत्राशी जोडला गेलेला आहे आणि चला हवा येऊ द्या चा तो अविभाज्य भाग म्हणूनही बनलेला आहे. मात्र ह्या प्रकरणामुळे तो चांगलाच अडचणीत आला होता. विनाकारण त्याला हा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळेच त्याने सोशिअल मीडियावर गुलकी जोशी ह्यांना टॅग करून होत असलेल्या प्रकाराबाबद कळवलं होत. नुकताच गुलकीचा माफी मागत असल्याचं व्हिडिओ शेअर करत तो म्हणतो कि आशा करतो आता तरी गुलकी हिचे चाहते मला त्रास देणार नाहीत. आणि ह्या सर्व प्रकरणात ज्यांनी मला साथ दिली थांचे देखील मी खूप आभार मानतो. तुषारची पत्नी हि देखील अभिनेत्री आहे. तीच नाव स्वाती देवल असं असून सध्या “तुझी माझी रेशीमगाठ” या मालिकेत ती स्नेहाच्या वहिनीची भूमिका साकारत आहे.