मंगळवारी रात्री प्रवास करत असताना अभिनेत्रीच्या कारने अचानक पेट घेतला. कार अचानक पेट घेत असल्याचे पाहून या अभिनेत्रीने रस्त्यावर असलेल्या व्यक्तींच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत स्वतःचा बचाव केला या अभिनेत्रीचे नाव आहे यामिनी मल्होत्रा. यामिनी मल्होत्रा ही हिंदी मालिका अभिनेत्री तसेच मॉडेल म्हणून परिचयाची आहे. सुरुवातीला काही काळ तिने मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम केले होते. गुम है किसीं के प्यार में या लोकप्रिय हिंदी मालिकेतून तिने महत्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे यामिनी मल्होत्रा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. मैं ‘तेरी तू मेरा मधूनही तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री यामिनी ड्राइव्ह करण्यासाठी आपली कारकाढून घटरून बाहेर पडली होती. जुहू वरून पुढे लोखंडवालाकडे जात असताना तिच्या कारने अचानक पेट घेतला. हे पाहून यामिनी सुरुवातीला खूप घाबरली. तिला गाडीतुन बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. काही मिनिटातच गाडीला लागलेली आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली. दरम्यान पोलीस आणि अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती तात्काळ दिली गेली मात्र ते घटनास्थळी दाखल होण्याअगोदरच गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली होती. यामिनी मल्होत्रा आपली गाडी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती मात्र या प्रयत्ना अगोदरच ती आगीच्या विळख्यात अडकली. मी लवकर गाडीच्या बाहेर पडले नसते तर माझेही काही बरे वाईट झाले असते असे यामिनीने घटनेबाबत सांगितले. सुरुवातीला गाडीच्या बोनेटमधून धूर निघू लागला होता. धूर का निघतोय हे कळण्याआधीच गाडीने अचानकपणे पेट घेतला थोड्या वेळात ही आग मोठ्या प्रमाणात वाढू लागली होती. मी पूर्णपणे घाबरून गेले होते परंतु उपस्थितांनी माझी या आगीतून सुटका करून दिली असे यामिनी म्हणाली. दरम्यान या घटनेबाबत कळताच तिच्या सहकलाकारानी तिच्या सुखरूपतेची चौकशी केली.