मृणाल दुसानिस आणि शशांक केतकरची प्रमुख भूमिका असलेली हे मन बावरे ही मालिका तुम्हाला चांगलीच आठवत असेल. २०१८ सालच्या या कलर्स मराठीवरील मालिकेत तुम्हाला अनुश्री आणि सिध्दार्थची प्रेमकहाणी पाहायला मिळाली होती. सिद्धार्थ आणि अनुश्री एकत्र यावेत म्हणून तिची खास मैत्रीण नेहा अनुश्रीला नेहमी मदत करताना दिसायची. आपल्यालाही नेहा सारखी एक मैत्रीण असावी असे प्रत्येकीच्या मनात येत होते. त्यामुळे या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले. ही भूमिका साकारली होती अभिनेत्री सायली परब शेलार हिने. हे मन बावरे मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली सायली झी मराठीवरील मालिकेतही झळकली होती.

चूक भूल द्यावी घ्यावी ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका, या मालिकेत सायलीने नळी ची भूमिका साकारली होती. जून महिन्यात सायलीने आपल्या डोहाळ जेवणाचे खास फोटो शेअर करून प्रेग्नन्ट असल्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही बातमी पाहून मराठी सेलिब्रिटींसोबत तिची सहकलाकार मृणाल दुसानिसने देखील सायलीचे अभिनंदन केले होते. शुक्रवारी १९ ऑगस्ट २०२२ रोजी सायलीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. या दिवसाचे आणखी एक खास वैशिष्ट्य असे की या दिवशी गोपाळकाला साजरा करण्यात आला होता. त्यामुळे सायलीच्या घरी जणू चिमुकल्या पावलांनी श्रीकृष्णाचेच आगमन झाले असल्याचे बोलले जात आहे. १ फेब्रुवारी २०२० रोजी व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या इंद्रनील शेलार सोबत सायली विवाहबद्ध झाली होती. सायली परब हिने कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकांकिका तसेच नाट्यस्पर्धामधून सहभाग दर्शवला होता. पुढे व्यावसायिक नाटकातून तिला अभिनयाची संधी मिळत गेली. यातूनच सायलीला मालिकेत झळकण्याची संधी मिळाली. लग्नानंतर सोनी मराठीवरील ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत ती पाहायला मिळाली होती.

हुतात्मा वेबसिरीज तसेच झी मराठीवरील चूक भूल द्यावी घ्यावी, हे मन बावरे या गाजलेल्या मालिकेमुळे सायलीला अमाप प्रसिद्धी मिळाली. अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन ती सध्या आपल्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. बऱ्याच अभिनेत्री मुलाला जन्म दिल्यानंतर बराच काळ मालिका किंवा चित्रपटात काम करताना पाहायला मिळत नाही. खरतर हा क्षण प्रत्येक महिलेसाठी खूपच आनंदच क्षण मानला जातो. यामुळेच अनेक महिला कामातून विरंगुळा घेत ह्या सुंदर क्षणाना साथ देत आनंद लुटताना पाहायला मिळतात. पण काही दिवसानंतर सायलीने पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री करावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. असो अभिनेत्री सायली परबला आणि पती इंद्रनील शेलार यांना पुत्ररत्न प्राप्तीच्या आणि आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!.