Breaking News
Home / जरा हटके / मी सर्वांची लाडकी कीर्तनकार असं म्हणत शिवलीला पाटील ह्यांनी घेतला हा मोठा निर्णय म्हणाली

मी सर्वांची लाडकी कीर्तनकार असं म्हणत शिवलीला पाटील ह्यांनी घेतला हा मोठा निर्णय म्हणाली

बिग बॉस मराठी ३ मध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील हिने अचानक आजारपणाच कारण सांगून बिगबॉसच्या घरातून काढता पाय घेतला होता. पण त्यावेळी ती बरी होऊन पुन्हा खेळात सहभागी होणार असं म्हटलं होत. पण नुकताच तिचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय त्यात ती एक दवाखान्यात ऍडमिट असल्याचे दसून येते. बिगबॉसच्या घरात तिने त्यावेळी दिलेला संदेश महेश मांजरेकर ह्यांच्या उपस्तितीत दाखवण्यात आला. चला तर जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील नक्की काय म्हणाल्या ते….

shivlila patil kirtankar in hospital
shivlila patil kirtankar in hospital

कीर्तनकार शिवलीला पाटील म्हणाल्या ” रामकृष्णहरी, मी सर्वांची लाडकी कीर्तनकार हरिभक्त परायण कुमारी शिवलीला बाळासाहेब पाटील मी बिगबॉस सीजन ३ ह्या मराठी कार्यक्रमात सहभागी झाले होते. माझी तब्बेत अचानक खराब झाली होती त्यानंतर बिगबॉसच्या घरामध्येदेखील ३-४ टेस्ट झाल्या होत्या. टॅबलेट घेतल्या, गोळ्या घेतल्या, औषधे घेतली ट्रीटमेंट देखील घेतली परंतु त्याचा काहीच फायदा होत नव्हता. आराम करून देखील काहीच फायदा झाला नाही त्यामुळे मी हॉस्पिटलला शिफ्ट झाले. तेंव्हापासून आत्तापर्यंत माझी ट्रीटमेंट चालू आहे. अजूनही विकनेस आहेच. त्यामुळे मी स्वतःहून बिगबॉसमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. कारण माझं शरीर मला साथ देत नाहीयेत्यामुळे मला नाही वाटत कि मी आता तेथे भाग घेऊ शकेन. त्यामुळे बाहेर येन हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मी स्वतःच्या मतावर ठाम आहे. मी स्वतःच्या मर्जीने ह्या शो मधून बाहेर येत आहे. मला महेश सरांची माफी मागायची आहे मी त्यांना सांगितलं होत कि मी नक्की सहभागी होतील पण आता ते शक्य वाटत नाही. सर्वानी माझी काळजी घेतली. विशेष म्हणजे विशाल दादा, मीनल सोनाली, सुरेख ताई ह्या सर्वांशी माझं चांगलं बॉण्डिंग झालं. मला तुमच्या सोबत राहायची इच्छा होती.”

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *