
हर हर शंभो शंभो महादेवा शंभो हे गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं तर घराघरात पोहोचलं आहेच पण त्यासोबत या गाण्याची गायिकाही प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. १९ वर्षाची अभिलिप्सा पांडा हिने हे गाणं अशा काही अंदाजात म्हटलं आहे की सध्या तरी सोशलमीडियावर अभिलाषाचीच हवा आहे. वयाच्या १९ व्या वर्षी या गाण्याने सोशलमीडियावर हिट झालेल्या अभिलिप्सा पांडाबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या हर हर शंभो हे गाणं ज्या फरमानी नाझने गायलं आणि त्यामुळे मुस्लिम समाज तिच्या विरोधात उभा ठाकला आहे त्या गाण्याची मूळ गायिका खरंतर अभिलाषा पांडा आहे. फरमानीने अभिलिप्साने गायलेलं हर हर शंभो हे गाणं कॉपी केलं आहे.

श्रावण सुरू होण्यापूर्वी अभिलाषाने हर हर शंभो हे गाणं रेकॉर्ड केलं. श्रावणात एक नवं गाणं गायचं या विचाराने गायलेल्या या गाण्याने अभिलाषाला रातोरात स्टार बनवलं. सुरूवातीला सोशलमीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला आणि आता प्रत्येकाच्या तोंडी या गाण्याचे सूर घुमत आहेत. त्यात मुस्लिम असलेल्या फरमानी नाज हिने हे गाणं गायल्याने तिला मुस्लिम समाजाकडून होत असलेल्या विरोधामुळे या गाण्याची आणि अभिलाषा पांडा या मूळ गायिकेची चर्चा सुरू आहे. ओडिशाची पोरगी असलेली अभिलिप्सा पांडा गाण्यासाठी लहानपणापासूनच वेडी आहे. ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील देवगढ हे तिचं गाव. वडील अशोक हे आर्मीमध्ये होते तर सध्या ते सिक्यूरिटी गार्ड आहेत. आई शिक्षिका आहे. वयाच्या चौथ्यावर्षापासून व्हायोलीन वादक असलेले तिचे आजोबा रवीनारायण यांच्याकडे अभिलाषा गाणं शिकतेय. पाचव्या वर्षीच तिने क्लासिक व्होकलमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर अभिलिप्सा संगीतातील एकेक पायरी चढत इथंपर्यंत पोहोचली आहे.

तिने हिंदुस्थानी व्होकलचं शिक्षण पूर्ण केलं, क्लासिकल व्होकलमध्येही तिनं शिक्षण घेतलं. अभिलाषाने आजपर्यंत ८ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. गीता दत्त आणि सुनिधी चौहान या तिच्या आवडती गायिका असून तिच्यापासून प्रेरणा घेत अभिलिप्सा ओडिशा सुपरसिंगर या शोमध्येही सहभागी झाली होती. सध्या ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकतेय. गाण्याबरोबरच अभिलिप्सा कराटेमध्येही चँपियन आहे. मार्शल आर्टच शिक्षण घेत तिने अनेक मेडल्स देखील कमवली आहे. पण तिला गाण्यात जास्त रस आल्यामुळे आणि घरातील लोकांची गाण्यालाच प्रथम पसंती असल्याने तिने ह्याच क्षेत्रात पुढं जाण्याचं ठरवलं. फक्त हार हार शंभू च नाही तर तिने अनेक गायलेली गाणी सुपर हिट झालीत. पण सध्या तरी अभिलिप्सा हिट झालीय ती हर हर शंभो या गाण्याने.