गोट्या म्हटलं कि आजही ४० शी गाठलेल्या लोकांना डोळ्यांसमोर गोट्या मालिकेतील गोट्याचा चेहरा आठवतो. आजही हि मालिका लोक सोशल मीडियाच्या माध्यमाने पाहताना पाहायला मिळतात. मालिकेचे कथानक, म्युझिक, गाणी, शीर्षक गीत आणि त्या मालिकेत असलेल्या कलाकारांनी केलेला अभिनय ह्यामुळे हि मालिका त्यावेळी सुपरहिट ठरली होती. एक गरीब मुलगा आपल्यावर आलेल्या अडचणींना कश्याप्रकारे प्रामाणिकपणे सामोरे जातो ह्यावर हि संपूर्ण मालिका होती. या मालिकेत बालकलाकार गोट्याची भूमिका साकारली होती ‘जॉय घाणेकर’ या बालकलाकाराने. गोट्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवलेला जॉय घाणेकर पुढे जाऊन मोजक्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकला. पण ह्या मालिकेत असेही बरेच कलाकार आहेत जे आजही अनेक मालिकांत पाहायला मिळतात.

याच एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नेहाच्या शेजारी राहणाऱ्या काकूंची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी मागिकर यांनी गोट्या मालिकेत माईंची भूमिका साकारली होती. तर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेता किरण माने यांच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सविता मालपेकर देखील गोट्या मालिकेत पाहायला मिळाली होती. पण आज आम्ही तुम्हाला अशीच एक वेगळी माहिती देणार आहोत जी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. झी मराठी वाहिनीवर सध्या सुरु असलेली मालिका ‘हृदयी प्रीत जागते’ ह्या मालिकेतील वीणाचे मामा म्हणजेच अभिनेता पंकज विष्णू यांनी देखील गोट्या मालिकेत काम केलं होत. होय गोट्या मालिकेत बालकलाकार म्हणून ३३ वर्षांपूर्वी अभिनेता पंकज विष्णू ह्यांनी देखील भूमिका साकारली होती. गोट्या ज्या हॉटेलमध्ये काम करत असतो त्या हॉटेलमध्ये कित्तेक वर्षांपासून तेही काम करत असत. शंकऱ्या, गण्या, रम्या आणि बाळ्या हे चार मुले त्याच हॉटेलमध्ये काम करत असतात. पण आपल्या नंतर ४ वर्षांनी कामाला आलेल्या गोट्या आपल्या मालकाचं मन जिंकतो आणि मालक गोट्यालाच चक्क गल्यावर बसवतो हे तेथे काम करत असलेल्या ह्या ४ जणांना अगदीच रुचत नाही आणि मग ह्यातला शंकर जो सर्वात मोठा असतो तो गोट्याला धाक दाखवतो आणि हे सगळे मिळून ते गोट्याची पिळवणूक करायला सुरवात करतात.

गोट्याला चांगला चोप देखील देतात ह्या मुलांमध्ये गण्या म्हणजे अभिनेता पंकज विष्णू हे देखील पाहायला मिळाले. पुढे अभिनेता विजय कदम गोट्याला भांडणातून सोडवतात. विजय कदम ह्यांनी देखील एका दारुडा असलेल्या ट्रक ड्रॉयव्हरची भूमिका अगदी चोख बजावली होती. गोट्या मालिकेच्या ३ ऱ्या आणि ४ थ्या भागात तुम्हाला पंकज विष्णू पाहायला मिळतात. तेंव्हाचा त्यांचा लूक देखील आजच्या इतकाच स्मार्ट होता हे फोटो पाहून तुम्हालाही समजून येईलच. गोट्या म्हणजे अभिनेता जॉय घाणेकर आता परदेशात स्थायिक आहे. तर मालिकेतील बरेचसे कलाकार आजही चांगल्या भूमिका साकारताना पाहायला मिळतात त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता पंकज विष्णू. पंकज विष्णू यांनी विनाकारण राजकारण, सूर्या,पैसा पैसा, युद्ध अश्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. इतकाच नाही तर त्यांनी अनेक हिंदी मालिका देखील केल्या आहेत. हरपूल मोहिनी, गुम है किसीके प्यार मै, तुझसे है रबता, CID अश्या अनेक हिंदी मालिका साकारल्या आहेत. असो हृदयी प्रीत जागते ह्या मालिकेसाठी अभिनेता पंकज विष्णू ह्याला खूप खूप शुभेच्छा…