वेड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर रितेश देशमुखने या चित्रपटात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. नुकताच वेड चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा यशस्वीपणे पार केलेला आहे. हा प्रतिसाद पाहून रितेशने सोशल मीडियावरून प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आज सायन येथील मुव्ही मॅक्स या मल्टिप्लेक्समध्ये रितेश आणि जेनेलियाने हजेरी लावली होती. चित्रपट संपल्यावर वेड लावलंय या गाण्यावर डान्स करत त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रेक्षकांना आपल्या चित्रपटात काय बदल होणार आहेत याची माहिती दिली. उद्या २० जानेवारी पासून वेड चित्रपटात काही बदल पाहायला मिळणार आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्यावर सुद्धा एक रोमँटिक गाणं ऍड करण्यात आलं असून अशोक सराफ, खुशी हजारे यांना देखील सिन वाढवून देण्यात आले आहेत.

चित्रपटातील हे सकारात्मक बदल तुम्हाला उद्यापासून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सिनेमा लव्हर्स डे च्या निमित्ताने प्रेक्षकांना हा चित्रपट केवळ ९९ रुपयांत पाहायला मिळणार असल्याची माहिती रितेशने यावेळी दिली. रितेश आणि जेनेलियावर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. जेनेलियाचा हा अभिनित केलेला पहिलाच मराठी चित्रपट आहे. रितेश सोबत लग्न झाल्यानंतर जेनेलिया अभिनय क्षेत्रापासून बाजूला होती. घर संसार, मुलांची जबाबदारी तिने नेटाने सांभाळली. मात्र आता तिने चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशी विचारणा तिला केली जात आहे. चित्रपटात काम करण्याबाबत जेनेलियाचे एक मत आहे. आता वयाची ३५ ओलांडताना तशा धाटणीच्या भूमिका याव्यात याचा ती विचार करते. वयाचा एक टप्पा मी ओलांडला आहे. ज्या काळात लव्हस्टोरी दाखवणारे चित्रपट करायचे होते ते तिने केले. मात्र आता आपण वेगळ्या वयोगटात मोडतो हे ती आवर्जून सांगते. खरं तर ५० ओलांडली तरीही अभिनेत्रींना नायिकेच्या भूमिका मिळाव्यात अशी अपेक्षा केली जाते. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे अनुभवायला मिळतात. मात्र जेनेलियाचे याबाबतचे मत मात्र स्पष्ट आहे. वेळ ओळखून आपण त्याच पठडीतील भूमिका साकारल्या तर ते प्रेक्षकांना सुद्धा आवडणार नाही.

याचा सारासार विचार करूनच ती म्हणते की, ” आज मी दुसर्या वयोगटात आहे आणि मला त्या वयोगटातील भूमिका करायच्या आहेत. मला वाटते की आजच्या काळात अधिक चांगल्या भूमिका लिहिल्या जातात. तू एकटी आई असू शकतेस, विवाहित आई असू शकतेस, तुझी प्रेमकथा असू शकते, हा वयोगट खूप सुंदर आहे. मला आशा आहे की माझ्यासाठी त्या झोनमध्ये भूमिका लिहिल्या जातील”. गेल्या अनेक वर्षांपासून जेनेलिया चित्रपटात भूमिका साकारताना पाहायला मिळाली नव्हती. तिच्याकडे चांगल्या डायरेक्टरच्या उत्तम भूमिका देखील आल्या होत्या पण त्यावेळी त्या भूमिका तिने करायच्या टाळल्या होत्या. आता मराठीतील वेड चित्रपटामुळे तिला अनेक लोक पुढे कोणते चित्रपट करणार आहेस असा सवाल सर्रासपाने विचारताना पाहायला मिळत आहेत त्यामुळेच स्पष्ट बोलत अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिने आपलं मत मांडलं आहे.