त्या उत्तरामुळे मराठी अभिनेत्याला विमानतळावर अडवलं गेलं.. तुम्ही इथे का आलात आणि तुमचा हेतू काय ह्यावर दिलं हे उत्तर
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे सध्या यशाच्या शिखरावर असलेला पाहायला मिळतो आहे .कारण त्याच्या या लोकप्रियतेमुळे गौरव तब्बल एक दोन नव्हे तर तीन चित्रपटातून झळकणार आहे. ऑक्टोबर महिन्यात गौरवने अभिनित केलेले तीन चित्रपट एकामागोमाग एक प्रदर्शित होत आहेत ही गौरव साठी खरंच गौरवाची गोष्ट ठरली आहे. लवकरच त्याचा बॉईज ४ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे त्याचमुळे गौरव सध्या हास्यजत्रामध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतो. बॉईज ४ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.
यानिमित्ताने गौरवच्या विमानतळावरचा एक किस्सा व्हायरल होत आहे. गौरवने विमानतळावर एक शब्द म्हटला ज्यामुळे त्याचे युकेला जाणे रद्द झाले. हा शब्द कोणता आहे ते चित्रपटातील कलाकार पार्थ भलेरावने सांगितले आहे. पार्थ भालेराव याने चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्याने गौरवचा हा किस्सा शेअर केला. गौरव मुंबईहून युकेला निघाला. युकेला त्याला इमिग्रेशनवेळी प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुम्ही इथे का आला? इथे येण्याचा तुमचा नेमका उद्देश काय आहे?’ हा प्रश्न विचारताच गौरवने ‘शूटिंग’ असे उत्तर दिले. गौरवचे हे उत्तर ऐकून त्याला तिथेच अडवण्यात आले. पण या घटनेमुळे चित्रपटाची संपूर्ण टीम सावध झाली आणि फक्त शूटिंग न म्हणता ‘चित्रपटाचं शूटिंग किंवा फिल्मोग्राफी म्हणा’ असा सल्ला प्रत्येकाला देण्यात आला.
दरम्यान गौरवला बॉईज ४ निमित्त परदेश दौरा करता आला नाही ही खंत त्याने एका मुलाखतीत बोलून दाखवली होती. काहीच दिवसांपूर्वी गौरव मोरे अभिनित ‘अंकुश’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. येत्या २० ऑक्टोबरला त्याचा ‘बॉईज ४’ हा चित्रपट रिलीज होत आहे तर २७ ऑक्टोबरला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट रिलीज होत आहे. ऑक्टोबर या एकाच महिन्यात गौरवचे तीन चित्रपट रिलीज होत आहेत त्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. यासोबतच प्रसाद ओक सोबत तो महापरिनिर्वाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर हास्यजत्रा मधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे गौरवची गाडी सध्या सुसाट वेगाने धावत आहे.