Breaking News
Home / जरा हटके / गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा गाण्यातील अभिनेत्री आता दिसते अशी

गारवा वार्‍यावर भिरिभर पारवा नवा नवा प्रिये नभात ही चांदवा गाण्यातील अभिनेत्री आता दिसते अशी

२३ जुलै १९९८ साली ‘गारवा’ हा मराठी अल्बम प्रदर्शित झाला होता. ह्या गाण्याची लोकप्रियता एवढी वाढली होती की पाऊस आला की हे गाणं कुठेही हमखास ऐकलं जायचं. त्याकाळात अनेक तरुणांनी ह्या गाण्याच्या कॅसेट्स देऊन प्रेयसीला पटवले होते अशी गोड आठवण मिलिंद इंगळे यांनी सांगितली होती. खरं तर मिलिंद इंगळे यांनी गारवा मधली गाणी अनेक म्युजिक कंपन्यांना दाखवली मात्र तीन चार वर्षे त्यांना सगळीकडून नकारच मिळत गेला शेवटी राजश्रीमधून रजत सरांनी मिलिंदला ‘तुझ्याकडे काही प्रोजेक्ट आहे का?

actress smita bansal
actress smita bansal

अशी विचारणा केली. तेव्हा ही गाणी अप्रतिम असल्याचा त्यांनी दावा केला. आज गारवा या अल्बमच्या काही खास आठवणी आपण जाणून घेऊयात…. गारवा साठी सुरुवातीला सुनील बर्वे ऐवजी सचिन खेडेकर यांना अगोदर पसंती दर्शवली होती. मात्र सचिन खेडेकर हिंदी चित्रपटात व्यस्त असल्याने त्यांनी मिलिंदला सुनील बर्वेचे नाव सुचवले होते. “सुनील बर्वे आणि स्मिता बन्सल” यांची जोडी गारवा या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. ये है प्रेम या हिंदी अल्बमच्या लोकप्रियतेमुळे स्मिताला मिलिंद इंगळे हे नाव माहीत झाले होते. त्यामुळे तिने मिलिंदचा अल्बम करणार असल्याचे ठरवले. अभिनेत्री स्मिता बन्सल ही अमराठी असल्याने गाण्यातील शब्दांचा अर्थ तिला समजत नव्हता यात सुनील बर्वेने प्रत्येक ओळीचा अर्थ सांगून या गाण्याचे शूटिंग पूर्ण केले होते. स्मिता मूळची राजस्थानची हिंदी मालिकांमधून तिने सुरुवातीला काम केले होते मात्र प्रथमच ती गारवा अल्बम मधून मराठी प्रेक्षकांसमोर आली होती. या मुळे स्मिता बन्सलचा चेहरा महाराष्ट्रात हिट झाला होता. तीचे नावाप्रमाणेच स्मित हास्य गारवा गाण्यातून तितकेच भाव खाऊन गेलेले पाहायला मिळाले होते.

smita bansal family
smita bansal family

या गाण्याची लोकप्रियता स्मिताला तेव्हा कळली जेव्हा ती राजस्थानमधील आपल्या घराबाहेर पावसात उभी असताना एका भरधाव गाडीतून गारवा…गाण्याचा आवाज तिला ऐकू आला त्यावेळी तिने आईला ओरडून सांगितले होते की “हे माझं गाणं आहे”…. म्हणजे केवळ मराठी प्रेक्षकच नाही तर बहुभाषिक प्रेक्षक या गाण्याच्या प्रेमात पडले होते हे तिला त्यावेळी समजले. एवढेच नाही तर एमटीव्ही या हिंदी म्युजिक चॅनलवर पहिल्यांदा कुठलं मराठी गाणं झळकल असेल तर ते होतं ‘गारवा….’ ही होती या गाण्याची खरी जादू… स्मिता बन्सल हे नाव हिंदी मालिका प्रेक्षकांसाठी काही नवे नाही. इतिहास, कहाणी घर घर की, बालिका वधू, कोरा कागज, आशीर्वाद, सरहदे, अमानत अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून ती नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बालिका वधू मध्ये तिने आनंदीची सासूबाई इतकी सुरेख रंगवली होती की या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले पाहायला मिळाले. आज स्मिता गारवा अल्बम नंतर हिंदी सृष्टीत रुळलेली दिसली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचे ते सौंदर्य आजही तितकेच अबाधित दिसते हे वेगळे सांगायला नको. २००० साली स्मिता अंकुश मोहला यांच्याशी विवाहबद्ध झाली होती, स्ताशा आणि अनघा या तिच्या दोन मुली तिच्याइतक्याच सुंदर आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *