फुलला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे ही सध्या एका गंभीर आजाराला तोंड देत आहे. आपल्या सोशल मीडिया मार्फत तिने तिच्या आजाराविषयी सांगितलं आहे. कलाकारा नेहमीच आपल्या आयुष्यातील छोटी मोठी गोष्ट चाहत्यांना सांगत असतात. त्यामुळे यावेळी भाग्यश्रीने आपल्या आजारपनाविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेत्रीला जो आजार झाला आहे त्यामध्ये तिला तिच्या शरीरात अचानक असह्य वेदना जाणवतात. एमआरआय केल्यानंतर त्यामध्ये तिला पेन्सोमनिया हा आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. त्यामुळे तिने आपल्या शूटिंगच्या कामातून देखील विश्रांती घेतली आहे. सध्या तिचे कुटुंबीय तिची काळजी घेत आहेत.

आपल्या शरीरात होत असलेल्या वेदना दूर करण्यासाठी ती सतत स्वतः च मन कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे नुकतीच ती एका छोट्याश्या ट्रीपला गेली होती. मनशांती आणि दुःखाचा विसर पडावा म्हणून तिच्या भावाने ही ट्रिप आयोजित केली होती. हवामान बदलल्यास तिला थोड बरं वाटेल असं त्याला वाटत होतं. आता भाग्यश्रीने तेथील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावाचे आभार मानले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ” दादा, माझ्या चेहऱ्यावरचं दुःख तुला पाहता येतं, मी भाग्यवान आहे मला तुमच्यासारखी माणसं भेटली. खूप धन्यवाद वहिनी आणि अर्णव, तुम्ही माझ्या पाठीचा कणा आहात.”भाग्यश्रीच्या या गंभीर आजारपणाबद्दल कळताच चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला लवकर बरी हो अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक जण तिला यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांत प्रोत्साहन देत आहेत. भाग्यश्री आपल्या सुट्यांमध्ये तिच्या गावी जाते. तिचं घर पुण्यातील सासवड येथे आहे. ती लहानपणापासून तिच्या कुटुंबीयांसह तिथे राहते. कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत अभिनेत्रीने रमा हे पात्र साकारलं होतं.

या मालिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्धी झोतात आली होती. तिने आता पर्यंत मराठी मलिका, चित्रपट तसेच बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. परफ्युम, स्त्रीलिंगी पुल्लिंग या मराठी चित्रपटांमध्ये ती रुपेरी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत तिने बाणाबाई होळकर हे पात्र साकारून त्याला पूर्णपणे न्याय दिला होता. यासह तान्हाजी या चित्रपटात तिला सूर्याजींच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोन करत तिने संगीत क्षेत्रात देखील आपलं नशीब आजमावल आहे. तिने काही म्युझिक व्हिडिओंसाठी देखील काम केलं आहे. फुलला सुगंध मातीचा फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हि लवकरात लवकर बरी होईल आणि पुन्हा मालिका आणि चित्रपटांत काम करताना पाहायला मिळेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना..