दाक्षिणात्य चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनचे नाव घेतले जाते. फॉर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय १०० सेलिब्रिटींच्या यादीत त्याने स्वतःचं नाव नोंदवलं आहे. अल्लू अर्जुनचे आजोबा कॉमेडीयन तर वडील निर्माते म्हणून टॉलिवूड सृष्टीत ओळखले जातात. २००३ साली गंगोत्री या दाक्षिणात्य चित्रपटाच्या माध्यमातून अल्लू अर्जुनने चंदेरी दुनियेत पाऊल टाकले होते. त्याचे बरेचसे चित्रपट सुपरहिट ठरले आहेत सोशल मीडियावर अल्लू अर्जुनचा खूप मोठा फॅनफॉलोअर्स आहे.

केवळ टॉलिवूडच नव्हे तर देशभरात त्याच्या चित्रपटांना पसंती मिळताना दिसते. नुकत्याच आलेल्या पुष्पा द राईज चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे . एवढेच नाही तर या चित्रपटातील त्याची हटके स्टाईल देखील खूपच लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. रिअल लाईफमध्ये देखील अल्लू अर्जुन तितकीच लैविश लाईफचा अनुभव घेत आहे . अल्लू अर्जुन त्याच्या कुटुंबासोबत हैद्राबाद मधील ज्युबिली हिल्स या आलिशान एरियात राहतो. बाहेरून त्याचं घर अगदी साधं सुधं दिसत असलं तरी सर्वसोयीसुविधांनी परिपूर्ण आहे. इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदा यांनी त्याच घर सजवलं आहे. विशेष म्हणजे सर्व रुमसाठी त्याने पांढऱ्या रंगला पसंती दिली आहे. प्रशस्त हॉल, किचन, गार्डन एरिआ आणि स्विमिंगपुल अशा सुखवस्तूनी त्याचं घर सजलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी यांची लव्हस्टोरी देखील खूपच इंटरेस्टिंग आहे असे म्हणायला हरकत नाही. एका जवळच्या मित्राच्या लग्नात अल्लू अर्जुनने स्नेहाला पाहिले होते.

स्नेहा रेड्डी ही के सी शेखर रेड्डी या प्रसिद्ध व्यवसायिकेची मुलगी आहे अमेरिकेतून शिक्षण घेऊन ती मायदेशी परतली होती. लव्ह ऍट फर्स्ट साईट असे म्हणतात तसेच अल्लू अर्जुनच्या बाबतीत घडले होते. मित्राच्या लग्नातच दोघांनी एकमेकांना आपापले फोन नंबर दिले आणि चॅटिंग सुरू झाले. पुढे ते दोघे अनेकदा एकमेकांना भेटू लागले. आणि ६ मार्च २०११ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. आयान आणि अरहा ही दोन अपत्ये त्यांना आहे. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून अल्लू अर्जुन आपल्या चिमुकल्यांसोबत खेळताना दिसतो. अल्लू अर्जुनची अवघ्या ५ वर्षांची मुलगी अल्लू अरहा ही बुद्धिबळ खेळात अगदी निपुण आहे. ‘यंगेस्ट चेस ट्रेनर ‘ म्हणून तिने नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं आहे. याशिवाय अरहाने शाकुंतल या आगामी दाक्षिणात्य चित्रपटातुन अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. बालभूमिकेतील राजकुमार भरतची भूमिका तीने साकारली आहे.