नागराज मंजुळे यांच्या फँड्री चित्रपटाने कमाल घडवून आणली होती. शालू आणि जब्या हे पात्र या चित्रपटामुळे खूपच लोकप्रिय झाले होते. चित्रपटातली शालू आजही तितकीच हिट असलेली पाहायला मिळते. शालूची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने. फँड्री या एकाच चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली राजेश्वरी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. तिच्या डान्सच्या व्हिडीओजना तुफान पसंती देखील मिळते. याचवरून ती नेहमी ट्रोल होताना दिसते. सध्या राजेश्वरी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे नुकतेच आपल्याला ट्रोल होताना पाहून राजेश्वरीने या ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले आहे. त्यामुळे तिचे हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पाहुयात ती या उत्तरात नेमकी काय म्हणाली आहे …

“अरे यार, मी काय म्हणतेय…तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढे प्रेम करता माझ्या सर्व post तुम्हा सर्वांमुळे चर्चेत येतात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खरच मनापासून आभार मानते. आणि फक्त एवढेच सांगते की, मला troll झाल्याने काही एक फरक पडत नाही मित्रांनो. फक्त एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवायची जास्तच हाैस असेल तर एका मुलीच्या comment box मध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा. मला बोलता ना, पूरग्रस्तांसाठी काही केले का, की फक्तं shorts घालून नाचतेय etc .. अरे मूर्खांनो, या सर्व कामांसाठी सरकार प्रशासन जबाबदार आहे, तुम्ही ज्याला निवडून दिले तो so called “साहेब, नेता” जबाबदार आहे मी नाही. तेथे गार पडता म्हणुन कोणालाही जोर दाखवायचा ? मी मान्य करते की सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण जो टॅक्स भरतो ना, त्याचा जाब विचारायला पण शिका नाहीतर आहेच माझ्या कमेंट बॉक्स मध्ये जागा.. ऑल वेज” राजेश्वरी खरातने ट्रोलर्सला दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिचे हे उत्तर खरं तर विचार करायला लावणारे आहे. मालिका, चित्रपट कलाकार नेहमीच खारीचा वाटा म्हणून आपत्तीमध्ये मदत करत असतात. यात राजेश्वरीने देखील मदत करायला हवी असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे होते. मात्र आपण जो सरकारला टॅक्स भरतो त्यातून ही जबाबदरी सरकारने पेलणे गरजेचे आहे. तिच्या ह्या डोळे उघडवणाऱ्या उत्तराने नक्कीच ट्रोलर्सला एक सणसणीत चपराक बसली आहे.