मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव हिच्या वडिलांचे संजीव चांदसरकर यांचे ३० नोव्हेंबर रोजी निधन झाले असल्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचं सावट पसरलं आहे. शंतनू आणि सायली अशी दोन अपत्ये त्यांना आहेत. आपल्या वडिलांच्या आठवणीत सायली संजीवने एक पोस्ट लिहिली आहे आणि त्याच बरोबर तीने बाबांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. “२६/७/१९५८ ते ३०/११/२०२१ तुला माहीत आहे ना बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं..” अस म्हणत सायलीने एक कविता बाबांच्या आठवणीत शेअर केली आहे.

दैव होता तू, देव होता तू, खेळण्यातला माझा खेळ होता तू, शहाणी होते मी वेडा होता तू, माझ्यासाठी कारे सारा खर्च केला तू, आज तू फेडू दे हे पांग मला , जगण्या रे मला अजूनही तूच हवा… बाबा, थांब ना रे तू..बाबा, जाऊ नको दूर “. सायली संजीव हिचे पूर्ण नाव आहे सायली संजीव चांदसरकर. ती मूळची धुळे येथील असून तिचे संपूर्ण शिक्षण नाशिक येथून झालं आहे. काहे दिया परदेस या मालिकेतून सायलीने मालिका सृष्टीत पदार्पण केले होते. यात तिने साकारलेली गौरीची भूमिका प्रचंड गाजली होती. पोलीस लाईन, आटपाडी नाईट्स, सातारचा सलमान, गुलमोहर, शुभमंगल ऑनलाईन यासारख्या मालिका आणि चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली आहे. नुकताच रिलीज झालेला झिम्मा हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवताना दिसत आहे. एकीकडे झिम्मा चित्रपटाचे यश अनुभवत असतानाच तिच्या कुटुंबावर वडिलांच्या निधनाने आता शोककळा पसरलेली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सायलीला आपली लेकच मानतात. माझ्या चेहऱ्यात आणि निवेदिता सराफ यांच्या चेहऱ्यात बरेचसे साम्य असल्याचे अनेक जण सांगतात असं सायली त्यांच्या नात्याबद्दल म्हणाली होती.