Breaking News
Home / जरा हटके / दमदार खलनायकाची झी मराठीवरील या मालिकेत होणार एन्ट्री

दमदार खलनायकाची झी मराठीवरील या मालिकेत होणार एन्ट्री

अभिनेते मिलिंद शिंदे यांनी आजवर खलनायकी ढंगाच्या भूमिका गाजवल्या आहेत. झी मराठीवरील ‘तू तिथे मी’ या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी दादा होळकर ही भूमिका साकारली होती. त्यात ते सतत तांबडे बाबांची पूजा करताना दाखवले होते. तांबडे बाबांमुळे मिलिंद शिंदे यांना एक वेगळी ओळख मिळाली याच भूमिकेमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते . नटरंग, पारध, नॉट ओन्ली मिसेस राऊत अशा चित्रपटातून त्यांनी आपल्या सजग अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, तुझ्या इश्काचा नाद खुळा, आई माझी काळूबाई, माझ्या नवऱ्याची बायको, सरस्वती अशा मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच मिलिंद शिंदे झी मराठी वरील मालिकेतून आणखी एका तगड्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नुकतेच झी मराठी वाहिनीने ‘येतोय एक खतरनाक

actor milind shinde
actor milind shinde

माणूस’ असे म्हणत सोशल मीडियावर हे जाहीर केले होते मात्र ते कोणत्या मालिकेत दिसणार हे गुलदस्यात ठेवले होते. मात्र यावरचा पडदा नुकताच हटलेला पाहायला मिळतो आहे. मिलिंद शिंदे आता देवमाणूस२ या मालिकेत झळकणार आहेत. मालिकेत नुकतेच डिंपल आणि डॉक्टरचे लग्न झाले आहे. परंतु सोनुने त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता हे पाहून डॉक्टरने सोनूचा काटा काढलेला आहे. सोनू आता ह्या जगात नाही हे पाहून तिची आई आता वेडी झाली आहे. त्यांची जमीन डॉक्टरने बळकावली आहे. त्यामुळे आता काही गुंड ती जमीन आपल्या साहेबांच्या नावावर करण्यासाठी डॉक्टरला धमकावत आहेत. या गुंडांचा साहेब लवकरच मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ही भूमिका आता मिलिंद शिंदे साकारणार आहेत. गुंडांच्या साहेबांची भूमिका डॉक्टरच्या कटकारस्थानाला तोडीसतोड असावी या हेतूने तशाच तगड्या कलाकाराची गरज होती. मालिकेची ही गरज पाहता मिलिंद शिंदे ही भूमिका आपल्या अभिनयाने सुरेख निभावतील असा विश्वास आहे.

devmanus doctor ajinkya deo
devmanus doctor ajinkya deo

त्यामुळे मिलिंद शिंदे देवमाणूस २ या मालिकेतून पुन्हा एकदा दमदार खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. डॉक्टर अजितकुमार या साहेबांच्या तावडीत अडकणार की त्याला देखील तो अशीच हुलकावणी देणार हे येत्या काळात मालिकेतून स्पष्ट होईल. मिलिंद शिंदे यांचा अभिनय क्षेत्रातला अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे दोन दशकाहून अधिक काळ ते या सृष्टीत वावरत असले तरी ते स्वतःला अभिनेते म्हणवून घेत नाहीत. कारण येणाऱ्या प्रत्येक भूमिकेतून काहीतरी शिकायला मिळते. त्यामुळे मी अजूनही शिकतच आहे असे त्यांचे म्हणणे असते. मिलिंद शिंदे यांच्या येण्याने देवमाणूस २ या मालिकेचा घटलेला टीआरपी निश्चितच वर येणार आहे. या नव्या भूमिकेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *