Breaking News
Home / जरा हटके / प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन या मराठमोळ्या सौंदर्यवती सोबत थाटला होता संसार

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन या मराठमोळ्या सौंदर्यवती सोबत थाटला होता संसार

प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे आज शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले आहे ते ८३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून राहुल बजाज कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला झुंज देत होते. हमारा बजाज…अशी त्यांनी आपल्या उद्योगाची लोकप्रियता जनमानसात मिळवली होती. तब्बल पाच दशकं त्यांनी बजाज ऑटो समूहाचे नेतृत्व स्वीकारले होते. औद्योगिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान लाभलेल्या आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व असलेल्या राहुल बजाज यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल बजाज यांचा अल्पपरिचय जाणून घेऊयात…

rahul bajaj family
rahul bajaj family

राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळांमधून झाले. त्यांनी १९६८ साली दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए ची पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करता करता त्यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उमेदवारी केली होती. १९६४ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील एमबीएची पदवी प्राप्त केली. १९६५ साली ते बजाज ग्रुपचे चेअरमन झाले होते. २००५ साली चेअरमन पदावरून पायउतार झाले. पुढे त्यांचे पुत्र राजीव बजाज हे बजाज ग्रुप चे व्यवस्थापकीय संचालक बनले . राहुल बजाज हे २००६ ते २०१० या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणूनही निवडून गेले होते त्यामुळे राजकारणाचा देखील त्यांनी अनुभव घेतला होता. २०१६ च्या फोर्ब्ज च्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज हे ७२२ व्या क्रमांकावर होते. १९६१ साली राहुल बजाज मराठमोळ्या सौंदर्यवती असलेल्या रुपा घोलप यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. रुपा घोलप या त्याकाळातल्या मॉडेल तसेच सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जात.

rahul bajaj photo
rahul bajaj photo

उमेदीच्या काळात त्यांनी मॉडेलिंग केले होते. काळासोबत अपडेट राहायला त्यांना नेहमीच आवडत असे. त्यांना हेअर ऑइल सारखे सौंदर्य प्रसाधने बनवण्याची हौस होती. याशिवाय आयुर्वेदिक औषधांची देखील बरीचशी माहिती त्यांना ज्ञात असल्याने हाफ डॉक्टर म्हणूनही त्यांना ओळख मिळाली होती. वनिता मंडळची स्थापना करून त्यांनी महिलांना सक्षम बनवण्यासाठी हातभार लावला होता. यातून स्वेटर विणणाऱ्या तसेच लहान मुलांचे कपडे हाताने शिवणाऱ्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले होते. अनेक महिला सल्ला घेण्यासाठीही त्यांच्याकडे जात असत. रुपा बजाज यांचे २०१३ साली निधन झाले होते. राहुल बजाज आणि रुपा बजाज यांना राजीव, संजीव आणि सूनयना अशी तीन अपत्ये आहेत. राहुल बजाज आपल्या पत्नी रुपा बजाज यांच्याबद्दल बोलताना नेहमी भरभरून बोलायचे..माझी पत्नी खूप समजूतदार होती आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलंय अशा शब्दात ते त्यांचे कौतुक करायचे. राहुल बजाज आणि रुपा बजाज यांचा प्रेमविवाह होता. बजाज कुटुंबातील पहिला प्रेमविवाह म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *