Breaking News
Home / जरा हटके / या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अटक नशेत गाडी चालवून पोलिसांना मारहाण करत

या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अटक नशेत गाडी चालवून पोलिसांना मारहाण करत

काल १७ फेब्रुवारी २०२२ च्या सकाळी जुहू येथे एक अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अभिनेत्री काव्या थापर हिला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. यादरम्यान काव्याने महिला पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न देखील केला असल्याने हा वाद चिघळल्यामुळे काव्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर न्यायालयीन कोठडीत तिची रवानगी करण्यात आली आहे. जुहू पोलिसांनी ट्विट करत दाक्षिणात्य अभिनेत्री काव्या थापरला अटक केली असल्याचे सांगितले आहे. दरम्यान काव्याने दारू पिऊन वाहन चालवले होते यात रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली होती.

actress kavya thapar
actress kavya thapar

याप्रकरणी तत्काळ जुहू पोलिसांनी हजेरी लावून काव्याला अटक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काव्याने पोलीस अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ आणि मारहाण केली. बऱ्याच हुज्जतीनंतर काव्याला ताब्यात घेण्यात आलं. काव्या थापर ही हिंदी ,तमिळ आणि तेलगू चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात जन्मलेल्या काव्याने बॉम्बे स्कॉटिश स्कुलमधून शिक्षण घेतले आहे. ठाकूर कॉलेजमधून तिने बीकॉम ची पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर काव्याने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकले. २००३ सालच्या ‘तत्काल’ या चित्रपटातून काव्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तत्काल ही हिंदी भाषिक शॉर्टफिल्म होती यात तिने झाईशाचे पात्र साकारले होते. २०१८ साली ‘एक माया पेरेमीटो’ या तेलगू चित्रपटात झळकण्याची नामी संधी तिला मिळाली. तिने साकारलेली शीतल जैन प्रेक्षकांना भावली होती. मार्केट राजा एमबीबीएस, एक मिनी कथा अशा मोजक्या तमिळ तसेच तेलुगू चित्रपटातून काव्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दारूच्या नशेत असताना काव्याने गाडी चालवल्यामुळे तिला नुकतीच अटक झाली आहे. या प्रकरणामुळे काव्या थापर प्रकाशझोतात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणे आणी महिला पोलिसाला मारहाण करणे हे प्रकरण आता काव्याच्या अंगलट आलेले पाहायला मिळत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *