अभिनेत्री मधू कांबीकर ह्या एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई साकारून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. झपाटलेला २ ह्या चित्रपटानंतर त्या फारशा चित्रपटात दिसल्या नाहीत. ह्याच एक कारणही आहे. साधारण चार ते पाच वर्षांपूर्वी पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते.

तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता याच आजारपणामुळे गेली चार वर्ष त्या अंथरुणाला खिळून आहेत. सध्याच्या को’ रो ‘ना च्या काळात त्यांच्या घरच्यांनी लसीकरणाची मागणी गेली होती. त्या अंथरुणाला खिळून असल्याने त्यांना बाहेर जाऊन लस घेणे शक्य नव्हते. पण अनेकदा विनवण्या करूनही त्यांना लस मिळत नव्हती. पण हीच बाब पिंपरी चिंचवडच्या रुग्णालयातील डॉक्टरांपुढे मांडली मराठी रंगभूमीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आता अश्या अवस्थेत असल्याने त्यानी पुढाकार घेऊन मधू कांबीकर ह्यांच्या पुण्यातील येरवडा येथील राहत्या घरी जाऊन त्यांना लसीकरण करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. मधू कांबीकर यांचा मुलगा प्रीतम आणि सून शीतल ह्यांनी डॉक्टरांचे आभार देखील मानले. मधुकांबीकर ह्यांनी आजवर अनेक चित्रपट नाटक तसेच लावणी नृत्यातून मराठी रसिकांना मंत्रमुग्ध केले मधुकांबीकर ह्या लवकरात लवकर नीट होवोत आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…