‘एक होता विदूषक’ चित्रपतील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार अमेरिकेत करतो हे काम
डॉ जब्बार पटेल लिखित आणि दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झाला होता. उत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने या चित्रपटाला गौरविण्यात आले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीतील हा एक महत्वाचा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात त्यांनी आबुरावची भूमिका साकारली होती. मधु कांबीकर, उषा नाईक, निळू फुले, पूजा पवार, वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात बालपणीच्या अबुरावच्या भूमिकेत झळकलेला बालकलाकार पुढे कोणत्या चित्रपटात दिसला नाही पण तो सध्या कुठे आहे आणि काय करतो हे जाणून तुम्ही नक्कीच त्याचं कौतुक कराल.
एक होता विदूषक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बालपणीची भूमिका असीम देशपांडे याने साकारली होती. एक होता विदूषक चित्रपटातील गाजलेलं गाणं जे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर येत ते म्हणजे “लाल पैठणी रंग माझ्या चोळीला” हे गाणं सर्व परिचित आहेच. ह्या गाण्यात मधू कांबीकर ह्यांच्या मागे उभा राहून जो मुलगा हे गाणं गातो तोच हा असीम देशपांडे. असीम देशपांडे याचे बालपण पुण्यातच गेले. पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर असीमने अमृतवाहिनी या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बीटेकची पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर्सची पदवी मिळवली. व्हर्जिनिया टेक येथे त्याने रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी केली.
असीम सध्या आयटी सल्लागार म्हणून काम करतो आहे यासोबतच त्याने सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनसाठीही काम केले आहे. असीम विवाहित असून त्याची पत्नी प्रांजली देशपांडे ही देखील आयटी क्षेत्रात नोकरी करत आहे. असीम आणि प्रांजली यांना दोन अपत्ये आहेत. हे कुटुंब सध्या अमेरिकेतील व्हरडॉन शहरात वास्तव्यास आहे. असीम देशपांडे अभिनय क्षेत्रात जास्त रुळला नाही केवळ एक होता विदूषक या चित्रपटासाठी तो ओळखला जातो पण या क्षेत्रात जम बसवण्यापेक्षा त्याने आपल्या आवडत्या क्षेत्राकडे लक्ष दिले. आयटी क्षेत्रात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तो सभाळत आहे.