
अँड टीव्ही वरील ‘डॉ बी आर आंबेडकर’ या हिंदी मालिकेत बहुतेक सर्वच मराठी कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. या मालिकेत “स्नेहा काटे शेलार” या अभिनेत्रीने मालिकेमध्ये जिजाबाईची भूमिका साकारली आहे. रामजीची दुसरी पत्नी जिजाबाई हे पात्र स्नेहाला साकारण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेव्यतिरिक्त स्नेहा मराठी मालिकांमधून महत्वाच्या भूमिकेत झळकली होती. स्वराज्यजननी जिजाबाई, प्रेमा तुझा रंग कसा, बाय बाय बायको, गर्ल्स हॉस्टेल, दुनियादारी फिल्मी इश्टाईल अशा अनेक मालिका, नाटकांमधून तिने अभिनय साकारला होता.

सुंदरा मनामध्ये भरली या लोकप्रिय मालिकेतील दौलत म्हणजेच अभिनेता “ऋषिकेश शेलार ” हा स्नेहाचा नवरा आहे. तर माझी तुझी रेशीमगाठ या झी वाहिनीच्या नव्याने सुरू झालेल्या मालिकेत स्नेहाची धाकटी बहीण देखील अभिनय साकारत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्नेहाची धाकटी बहीण आहे हे बहुतेकांना माहित नसावे. शेफालीची भूमिका अभिनेत्री “काजल काटे” हिने साकारली आहे. मालिकेत नेहाची मैत्रीण शेफाली खूपच धमाल उडवून देताना दिसत आहे. ५०० करोडचा नवरा मिळू दे म्हणून ती नेहमीच प्रयत्न करताना दिसते. त्यामुळे शेफाली आता समीर कंपनीचा बॉस असल्याचे समजून त्याच्या मागे लागली आहे. त्यामुळे समीर आणि शेफाली यांच्यातील गमतीजमती प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडतील. काजल काटे आणि स्नेहा या दोघी बहिणी मूळच्या नागपूरच्या . त्यांचे वडील “अशोक काटे” हे पोलीस निरीक्षक होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले. काजलला अभिनयाची आवड कॉलेजमध्ये असल्या पासूनच होती.

नागपूर येथे त्यांच्या नाटकाच्या ग्रुपने ठीक ठिकाणी नाट्यपथकं आयोजित केली होती त्यातून लोकांमध्ये जनजागृती घडवण्याचे काम त्यांनी केले होते. शिवाय विविध नाट्य स्पर्धेत देखील ती नेहमीच सहभागी होत असे. झी युवा वरील ‘डॉक्टर डॉन’, सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेतून तिने अभिनय साकारला आहे. २०१९ साली काजल काटे ही प्रतीक कदम सोबत विवाहबद्ध झाली. तुझं माझं ब्रेकअप या मालिकेनंतर काजलला पुन्हा एकदा झी वाहिनीवर झळकण्याची संधी मिळत आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत तिने साकारलेली शेफालीची भूमिका नक्कीच प्रभावी ठरेल हे वेगळे सांगायला नको. मालिका सुरु होऊन हा दुसराच आठवडा असला तरी मालिकेला खूपच प्रसिद्धी मिळालेली पाहायला मिळतेय. मालिकेतील शेफाली या भूमिकेसाठी काजल काटे हिचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…