Breaking News
Home / जरा हटके / महेश टिळेकरांच्या हवाहवाई चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण

महेश टिळेकरांच्या हवाहवाई चित्रपटात झळकणारी ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण

येत्या १ एप्रिल २०२२ रोजी ‘हवाहवाई’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश टिळेकर यांनी केली आहे. वन रूम किचन, गाव तसं चांगलं, लाडी गोडी असे अनेक वेगवेगळे विषय हाताळून दर्जेदार चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले आहेत. त्यांचे बहुतेक चित्रपट हे मल्टिस्टार असणारे चित्रपट ठरले आहेत. हवाहवाई या त्यांच्या आगामी चित्रपटात विजय आंदळकर, प्राजक्ता हनमघर, गौरव मोरे, समीर चौघुले, गार्गी फुले, अतुल तोडणकर असे बरेचसे कलाकार झळकणार आहेत.

haahawai film actress
haahawai film actress

महेश टिळेकर यांनी मराठी चित्रपटात नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस दाखवले आहे. ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम त्यांनी सीमेवर देखील गाजवला होता. त्यामुळे महेश टिळेकर यांचे कौतुक करण्यात आले होते. अगदी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री हेलन यांना देखील त्यांनी आपल्या मराठी चित्रपटात आणलं आहे. त्यांचा हा प्रयोग आगामी चित्रपटात देखील पाहायला मिळतो आहे. हवाहवाई या त्यांच्या आगामी चित्रपटात मल्याळम चित्रपट अभिनेत्री “निमिषा सयजन” हिला त्यांनी साइन केलं आहे. निमिषा सयजन ही मल्याळम चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय नायिका आहे. निमिषा सयजल ही मुंबईतच लहानाची मोठी झाली तिचे संपूर्ण शिक्षण देखील मुंबईतच झाले आहे. आठव्या इयत्तेत शिकत असताना निमिषाने टायकोंडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. टायकोंडो नॅशनल कॉम्पिटीशनमध्ये महाराष्ट्रराज्याकडून तीने प्रतिनिधित्व केले होते.

mahesh tilekar with south actress
mahesh tilekar with south actress

मराठी, हिंदी, आणि मल्याळम भाषेची चांगली जाण असलेल्या निमिषाने मल्याळम चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. इथे उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक तिने पटकावले होते. स्टँड अप, द ग्रेट इंडियन किचन, नयट्टू, छोला, मंगल्यम थंतुनानेना, ओरु कुप्रसिध पय्यन अशा चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. घर से ही हिंदी शॉर्टफिल्म तिने साकारली होती. हवाहवाई हा तिने साकारलेला साकारलेला पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि यात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे निमिषासाठी हवाहवाई हा चित्रपट खूप खास आहे याचित्रपटाची उत्सुकता तिला देखील लागून राहिली आहे. हवाहवाई हा मल्टिस्टार असणारा एक कौटुंबिक चित्रपट आहे त्यामुळे या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच होणार अशी आशा आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *