
देवमाणूस ह्या मालिकेने अतिशय कमी वेळात लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. रोज नव्याने येणाऱ्या ट्विस्ट मुळे ही मालिका सतत चर्चेचा विषय ठरली आहे. देवमाणूस ही मालिका जितकी लोकप्रिय झाली आहे तितकेच त्या मालिकेतील कलाकार सुद्धा लोकप्रिय झाले आहेत. या सर्व कलाकारांमध्ये खूपच चांगल बॉन्डींग सुद्धा आहे. मग ते अगदी सरू आजी पासून ते टोण्या पर्यंत. सरू आजीचे पात्र हे प्रेक्षकांचं फारच मनोरंजन करते. त्यामुळे आजीला तिच्या चाहत्यांनी विशेष पसंतीस उतरवले आहे. आजीचा फार मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. टोण्या पण त्याच्या सतत च्या गमतीजमती मुळे चर्चेत राहतच असतो. तो देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात मागे हटत नाही. टोण्या चा देखील वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

या मालिकेतील प्रत्येक व्यक्ती रेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील डिंपल चे सुद्धा अनेक चाहते आहेत. डिंपल को सिंपल मत समजना… मालिकेच्या सुरुवातीला हा तिचा डायलॉग फार फेमस झाला होता. आताच मालिकेत नव्याने एन्ट्री घेतलेल्या वकील मॅडम म्हणजेच आर्या ने सुद्धा लोकांची पसंती मिळवली आहे. तिचा देखील वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. ह्या मालिकेत काम करताना कलाकार जितके गंभीर होऊन काम करतात तितकीच मजामस्ती ते सेटवर करताना दिसून येत आहे. सध्या आर्या आणि डिंपल चा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आर्या आणि डिंपल ने ह्या व्हिडिओ मधे प्रियांका चोप्रा च्या देसी गर्ल ह्या गाण्यावर ठेका धरल्याचे दिसून येते. शूटिंग मधून फ्री वेळ मिळाल्यावर हे सर्व कलाकार धम्माल करत असतात. वेगवेगळ्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेक वेळा ए सी पी दिव्या, डिंपल, आणि संपूर्ण टीमचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असतात. आर्या आणि डिंपल च्या देसी गर्ल गाण्यावरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

त्या व्हिडिओ च्या खाली त्यांनी कातळ वाडीच्या देसी गर्ल अस कॅपशन सुद्धा टाकल होत. त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. खूप कमी वेळात ह्या व्हिडीओ ला भरपूर व्ह्यूज आले आहेत. तसेच त्यांचे चाहते ह्या व्हिडिओ वर मजेशीर कमेंट करत त्यांचं कौतुक देखील करत आहेत. सध्या देवमाणूस ही मालिका अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे मालिकेत दररोज येणाऱ्या नवीन नवीन ट्विस्ट मुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढीस लागली आहे. आता दिव्या सिंग डॉक्टरच सत्य सर्वांसमोर सिद्ध करण्यात यशस्वी होणार का आणि डॉक्टर फासावर लटकणार का ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.