दिल दोस्ती दुनियादारी मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली स्वानंदी टिकेकर हिने नुकतीच एक दुःखद बातमी शेअर केली आहे. स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नुकतेच स्वानंदीच्या मामाचे निधन झाले आहे. त्यामुळे ती तिच्या मामाला खूपच मिस करताना दिसत आहे. स्वानंदीचे मामा मानसिक दृष्ट्या विकलांग होते ते स्वानंदीच्याच कुटुंबात एकत्र राहत होते. ती अनेकदा आपल्या मामांसोबत मजामस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत होती. त्यांचा सदैव हसता खेळता स्वभाव पाहून स्वानंदी त्या क्षणाचा आनंद कॅमेऱ्यात टिपायची.

‘ही खूप हुशार आहे मुलगी, स्वानंदी. फार शहाणी मुलगी’ असे स्वानंदीचे मामा तिचे कौतुक करायचे. मात्र आता मामा दुःखद निधनाने तिने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, मी तुम्हाला किती मिस करते हे सांगू शकत नाही, तुमच्या जाण्याने मी माझा आनंद गमावून बसले आहे. पण तुमचं रक्त माझ्यात वाहत आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत कायम असणार आहात. तुम्ही जसा सगळ्यांना आनंद देत होता तसा आनंद मी इतरांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा हा वारसा मी जपणार आहे.’ असे भावनिक होऊन स्वानंदीने आपल्या मामासोबतच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर या स्वानंदीच्या आई तर अभिनेते उदय टिकेकर हे स्वानंदीचे वडील. दोघांतील गाण्याचे आणि अभिनयाचे गुण स्वानंदीने हेरलेले पाहायला मिळाले आहेत. स्वानंदीने आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय आणि गायन क्षेत्रात पाऊल टाकलेले पाहायला मिळते अर्थात गायन क्षेत्रात तिचा हातखंडा नसला तरी एक आवड म्हणून तिने गायनाची आवड जोपासली आहे. आभाळमाया या लोकप्रिय मालिकेत स्वानंदी बालकलाकाराची भूमिका साकारताना दिसली होती.

त्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत ती मिनलची भूमिका साकारताना पाहायला मिळाली. दिल दोस्ती दोबारा नंतर असं माहेर नको गं बाई या मालिकेतून ती प्रथमच मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळाली. सिंगिंग स्टार या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होऊन स्वानंदीने प्रथम क्रमांक पटकावला होता. मराठी इंडियन आयडॉलच्या पहिल्या वहिल्या सिजनची ती होस्ट बनली होती. आपल्या सहजसुंदर सुत्रसंचालनाने स्वानंदीचे प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. स्वानंदी आणि तिच्या मामाचे खूप चांगले बॉंडिंग जुळून आले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून स्वानंदी आपल्या मामांची काळजी घेत होती. अशातच त्यांच्या निधनाने स्वानंदी खचून गेली आहे. मात्र त्यांचा सदैव हसता खेळता स्वभाव पाहून ती त्यांचे अनुकरण करणार आहे आणि सर्वांना खुश ठेवणार असे तिने मामांना आश्वासन दिले आहे.