
यावर्षीचा मराठीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर धर्मवीर , मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडले. ., या सिनेमामुळे आणखी एक चर्चेत आलेलं नाव म्हणजे निर्माता मंगेश देसाई. मूळचा अभिनेता असलेल्या मंगेशने या सिनेमाची निर्मिती केली आणि प्रवीण तरडे याने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. एकूणच काय तर सगळीच भट्टी जमली आणि धर्मवीर सिनेमा हिट झाला. या सिनेमाची अजूनही जोरदार चर्चा आहेच, पण नुकतीच एक बातमी समोर आली आणि मंगेश देसाई यांच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडली.

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर बनवण्यात आलेल्या यासिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटवधींची कमाई केली आहे. आनंद दिघेच्या भूमिकेतील प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतील क्षितीश दाते यांनाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. अजूनही हा सिनेमा गर्दी खेचत आहे. अभिनेता निर्माता मंगेश देसाई याच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती त्याने सोशलमीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्या खुशालीच्या कमेंट केल्या आहेत. मंगेश कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना कोकण भवन या भागात त्याच्या कारला अपघात झाला. या अपघाताता सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मंगेशच्या गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. मंगेशने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांनी काळजी करून नये असं सांगताच चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.

धर्मवीर हा सिनेमा बनवण्याची प्रक्रिया गेल्या दीड वर्षापासून सुरू होती, त्यानंतर या सिनेमाचं शूटिंग, प्रमोशन, रिलीज झाल्यानंतरची गडबड यामुळे मंगेशला त्याच्या कुटुंबाला वेळ देता आला नव्ह्ता. त्यामुळे आता त्याने फॅमिलीसोबत ट्रीपला जाण्याचा निर्णय घेतला. रविवारी तो मुंबईतून कर्जतच्या दिशेने जात असताना नवी मुंबई परिसरात त्याच्या गाडीला अपघात झाला. आपण आणि कुटुंबीय सुखरूप असून मागून येणाऱ्या गाडीने धडक मारली असून दोघांमध्ये काहीही वादावादी घडली नसून दोघांनी समंजसपना घेतल्याचं त्याने ह्यावेळी नमूद केलं आहे. असो गाडीची थोडीफार दुरवस्था झाली असली तरी कोणालाही दुखापत झाली नसल्याने काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं त्याने चाहत्यांना सांगितलं आहे.