
डी पी म्हणजेच धनंजय पोवार याला सोशिअल मीडियामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. काही दिवसांपूर्वी चक्क हवा येउ द्या ह्या प्रसिद्ध कार्यक्रमात येऊन त्याने चांगलीच हवा केली होती. पण आता चर्चा आहे ती एका नव्या व्यवसायाची, नुकतच त्याने एका नव्या व्यवसायाची सुरवात केली आहे. धाराशिव परिसरात डी पी अमृततुल्य या नावाने त्याने आता चहाच्या व्यवसायात देखील उडी घेतली आहे. काही वेळा पूर्वीच त्याने आपल्या चहाच्या व्यवसायाचं उदघाटन करतानाचा एक व्हिडिओ सोशिअल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. वडिलांचा ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचरचा व्यवसाय सांभाळत त्याने आता आपला स्वतःचा ३ रा व्यवसाय सुरु केला आहे. सोशिअल मीडियाचा आधार घेत त्याने त्याचा योग्य वापर करत आपले स्वतःचे व्यवसाय प्रसिद्धीच्या झोतात आणले आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्याने “माईसाहेब वस्त्रम” हा साड्यांचा व्यवसाय देखील सुरु केला आहे. तर ह्यापूर्वी देखील त्याने स्पोर्ट्स शॉप टाकलं आहे. वडिलांचा व्यवसाय सांभाळात तो सोशिअल मीडियावर देखील चांगलाच ऍक्टिव्ह असतो. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॅन्स त्याला नेहमीच सपोर्ट करताना पाहायला मिळतात. पण हे आताचे चांगले दिवस सहजासहजी मिळालेले नाहीत त्यामागे त्याच्या वडिलांची खूप मेहनत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल आला होता त्यात त्यांनी केलेला स्ट्रगल पाहायला मिळाला. डीपी यांचे वडील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांनी स्वतःच्या बळावर ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात सोसायटी फर्निचर या नावाने फर्निचरचा व्यवसाय थाटात सजवला आहे. व्हिडीओ सोबतच इचलकरंजीत असलेले त्यांचे हे फर्निचरचे दुकान आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आहे. आज या व्यवसाया मागची त्यांची मेहनत कशी होती हा खडतर प्रवास त्यांनी कसा अनुभवला ते जाणून घेऊयात. धनंजय पोवार यांचे वडील पाचवी इयत्तेत शिकत होते. घरातील भावंडांमद्धे ते सर्वात लहान होते. त्यांचे थोरले बंधू हे नोकरीनिमित्त मुंबईला आले मात्र इथे त्यांचा जम बसला नाही. शेवटी गावी जाऊन त्यांनी एका फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करण्याचे ठरवले. त्यावेळी दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना ज्या फर्निचरची आवश्यकता होती ते फर्निचर तिथे मिळत नसायचे. याचाच विचार करून त्यांच्या भावाने फर्निचरचे एक छोटेसे दुकान थाटले.

बाहेरून फर्निचर मागवताना त्यांच्या भावाला बाहेरगावी जावे लागायचे त्यावेळी धनंजय पोवार यांचे वडील दुकानावर जाऊन बसायचे. पुढे या दुकानात त्यांच्या भावंडांनी देखील भागीदारी केली. पण कालांतराने डीपीच्या वडिलांनी भागीदारी मधून काढता पाय घेतला. पुढे एका ठिकाणी पान टपरीवर त्यांनी काम केले. मात्र याचे त्यांना काहीच पैसे मिळायचे नाही. पुढे असेच वायरमनचे काम त्यांनी केले. हातात पिशवी घेऊन गावोगावी ते वायरमनचे काम करू लागले. एकाच्या हाताखाली काम करत असताना तिथेही त्यांना असाच अनुभव आला. हाताला काम मिळेना आणि काम केले तर त्याचे पैसे कोणी देईना अशी त्यांची परिस्थिती होती. शेवटी भावाच्या मदतीने त्याने भाड्याच्या एका दुकानात फर्निचरचे दुकान टाकले. हळूहळू हा व्यवसाय भरभराटीला आला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द अंगी असल्याने प्रत्येक संकटांवर मात करत तब्बल ६० हजार स्क्वेअर फूट परिसरात त्यांनी फर्निचरचा व्यवसाय वाढवला. त्यांच्या या शो रूमची अख्ख्या कोल्हापुरात चर्चा झाली. अर्थात डीपीच्या प्रसिद्धी नंतर तर हे शोरूम आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. या शोरूम मध्ये अनेक कर्मचारी कामाला आहेत. त्यांच्याशी पोवार कुटुंबीय अतिशय सलोख्याने वागते. आदबीने बोलणे आणि मजेशीर स्वभावामुळे डीपीचे अनेक चाहते त्यांच्या शोरूमला भेटी देतात. त्यांच्याकडे आवर्जून वस्तू खरेदी करतात. जिभेवर गोडवा असेल तर व्यवसायात देखील भरभराटी येते हे पोवार कुटुंबीयांनी दाखवून दिल आहे.