महेश कोठारे यांचा धुमधडाका चित्रपट सर्वानी पाहिलाच असेल त्यातील बाप्पा बजरंगी हे नाव तुम्हाला नक्कीच चेहऱ्यासह आठवत असेल पण हे नुसतं सांगण्यासाठी लिहलेलं वाक्य आहे खरतर नुसत्या आवाजाने धडकी भरवून मराठीतील अजरामर चित्रपटात ज्यांनी खरा रंग भरला धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे “दीपक शिर्के”. मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांत म्हणजे खुदा गवाह, हम, वंश, जित, शपथ यासारख्या दमदार हिंदी चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत.

तर दूरदर्शन वरील “एक शून्य शून्य” मधील त्यांची भूमिकाही रसिकांच्या तितकीच स्मरणात राहिली आहे. टूरटुर, माझे काय चुकले या नाटकांसोबत सोनी वाहिनीवरील सीआयडी या मालिकेतदेखील ते झळकले. अत्यंत गरिबीतून मेहनतीची कामे करून त्यांनी आपलं बालपण घालवलं पण शिक्षणाचा ध्यास कधी सोडला नाही. पुढे चित्रपटांत छोटी मोठी कामे करून आज यश संपादन केलं. जवळपास १०० हुन अधिक चित्रपट आणि २५ हुन अधिक मालिका त्यांनी साकारल्या आहेत. महेश कोठारे आणि दीपक शिर्के यांची खास मैत्री होती त्यामुळेच महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात कधी मित्र तर कधी व्हिलन म्हणून ते आपल्याला नेहमी पाहायला मिळाले. महेश लक्ष्या आणि दीपक ह्यांचं जिवाहून प्यारा तुच माझा यारा हि दोस्ती तुटायची नाय हे गाणं आजही सुपरहिट आहे. महेश कोठारे यांच्या “झपाटलेला २” मध्ये देखील त्यांनी भूमिका साकारली होती. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकरण्याचं त्याची मैत्री हेच कारण आहे.

पांडू ह्या नव्या वेब सिरीज मधून ते पुन्हा छोट्या पडद्यावर झळकताना पाहायला मिळाले. अनेकांना दीपक शिर्के यांच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता असते पण इतका फेमस अभिनेता असूनही त्यांच्या बद्दल कधीच काही ऐकायला किंवा पाहायला मिळत नाही. दीपक शिर्के यांच्या पत्नीचे नाव गार्गी शिर्के असे आहे. गार्गी या दापोली येथे अध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. दीपक शिर्के आणि गार्गी हे दोघे २७ जुलै २००० साली विवाह बंधनात अडकले. दीपक शिर्के आणि गार्गी याना एक मुलगी देखील आहे. पण सांगताना अत्यंत दुःख होतंय आणि ऐकून तुम्हालाही आचार्य वाटेल कि १०० हुन अधिक चित्रपट आपल्या दमदार भूमिकेने गाजवूनही त्यांच्या अभिनयाला आजपर्यंत कुठलाही मोठा पुरस्कार मिळाला नसल्याचा खेद वाटतो. आजवर त्यांनी केलेलं कामाचं मराठी चित्रपट सृष्टीत मोलाचं योगदान असूनही त्यांना पाहिजे तशी लोकप्रियता मिळाली नाही.