Breaking News
Home / जरा हटके / देवयानी फेम या सुंदर मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली सोशल मीडियावर प्रेमाची कबुली

देवयानी फेम या सुंदर मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली सोशल मीडियावर प्रेमाची कबुली

सोशल मीडिया हे असे माध्यम जिथे आपल्या विचारांना मोकळी वाट करून देता येते. कलाकारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा हा एक अत्यंत सोपा असा मार्ग उपलब्ध झाला आहे. याच माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या आयुष्यातील अनेक सुख दुःखाचे क्षण शेअर करत असतात. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या बॉयफ्रेंडला चक्क प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. देवयानी या मालिकेतून मराठी सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे याच कारणामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्रीने सोशल मीडियावरून प्रेमात असल्याची जाहीर कबुली देत बॉयफ्रेंड सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

actress bhagyashri mote
actress bhagyashri mote

भाग्यश्री ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्याचे नाव आहे विजय पालांडे. Mine म्हणत भाग्यश्रीने विजय पालांडे सोबत रिलेशनमध्ये असल्याचे जाहीर केले आहे. तर इकडे देखील विजय पालांडे याने भाग्यश्री मोटे सोबतचा एक फोटो शेअर करत my love असं मिळालं आहे. दोघांनी देखील आपल्या प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ह्या दोघांचे एकत्रित फोटो कधीही सोशिअल मीडियावर पाहायला मिळाले नाहीत हा त्यांच्या फॅन फोल्लोवेर्स साठी सुखदः धक्का होता. तिच्या या फोटोवर मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर अनेकांनी आम्हाला हे अगोदरच माहीत होते असेही म्हटले आहे तर भाग्यश्रीच्या रिलेशनशिपवरून अनेक चाहत्यांची मनं तूटलेली पाहायला मिळत आहेत. विजय पालांडे हा मेकअप डिझायनर आहे गेल्या अनेक वर्षांपासून तो या क्षेत्रात कार्यरत आहे. देवयानी मालिकेत झळकल्यानंतर भाग्यश्रीने मुंबई मिरर, काय रे रासकला, माझ्या बायकोचा प्रियकर, पाटील, विठ्ठला अशा चित्रपटातून काम केले तर देवो के देव महादेव, सिया के राम, जोधा अकबर या हिंदी मालिकेतून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

vijay palande and bhagyashri mote
vijay palande and bhagyashri mote

अभिनेत्री भाग्यश्री मोटे एन्झायटी सारख्या आजाराशी झुंज देत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भूतकाळातील काही घटनांमुळे तिला हा त्रास जाणवू लागला. अधूनमधून पॅनिक अटॅक येऊ लागला पण मी झोपायचं टाळलं आणि त्या गोष्टीचा सामना केला असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली होती. मी व्यायाम केला जेणेकरून या त्रासातून माझी सुटका होईल. काही वेळा अनेकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागते परंतु आशेचा एक किरण पुन्हा नवी ऊर्जा मिळवून देतो आणि पुढे चालत राहायला शिकवतो असे तिने एका पोस्टमध्ये या आजाराबद्दल सांगितले होते. मराठी, हिंदी सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच तिने काही दाक्षिणात्य चित्रपटातून काम केले आहे. असो अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *