झी मराठी वरील देवमाणूस मालिका आता अंतिम टप्यात आहे. मालिकेत देवमाणूस म्हणजेच देविसिंगला अटक झाली असली तरी त्याने कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमुळे तो लवकरच सुटणार असल्याची चिन्ह जरी दिसत असली तरी तो पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकताना लवकरच पाहायला मिळणार आहे. मालिकेचे आता काहीच भाग शिल्लक असले तरी पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून राहते. मालिकेत अनेक पात्र आपलं चांगलं मनोरंजन करतात तर काही मनात राग हि भरतात. आज आपण मालिकेतील वंदी आत्याचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.

देवमाणूस मालिकेत डिम्पल आणि टोण्याच्या आत्या म्हणजेच “वंदी आत्या” हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच नाव आहे ” पुष्पा चौधरी”. अभिनेत्री पुष्पा चौधरी ह्यांनी साकारलेले देवमाणूस मालिकेतील वंदिआत्या हे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. मालिकेत गावठी भाषेत स्वार्थी महिलेचं हे पात्र पैश्यासाठी आणि प्रॉपर्टी साठी वाटेल ती शक्कल आणि बोंबाबोंब करून आपल्याला हवं ते मिळवण्याच्या प्रयत्नात असत. मालिकेत वंदिआत्या चा नवरा लालमामा हा देखील तश्याच स्वभावाचा दाखवला आहे. तोही फुशारक्या मारण्यात तरबेज दाखवला आहे. पण मालिकेत दाखवलेल्या ह्या कलाकारांच खार आयुष्य मात्र खूपच वेगळं आहे. लालमामा ची भूमिका साकारणारा अभिनेता शशिकांत डोईफोडे हे खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहेत. तर वंदिआत्या साकारणारी अभिनेत्री म्हणजेच पुष्पा चौधरी ह्या एक उत्तम गायिका आहेत. त्यांचे गाण्याचे अनेक लाईव्ह परफॉर्मन्स देखील होतात. अनेक स्टेज शो देखील त्यांनी केले आहेत. त्यांना विशेष म्हणजे लावणी गाताना लोक भरभरून दाद देतात. ह्याच सोबत माॕडेलींग क्षेत्राशी देखील त्या निगडित आहेत. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

पुष्पा चौधरी ह्यांचे पती प्रदिप चौधरी हे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नाला ३८ वर्ष पूर्ण झाली. त्यावर अभिनेत्री पुष्पा चौधरी ह्यांनी एक पोस्ट देखील शेअर करत म्हणाल्या ” आज आमच्या लग्नाला 38 वर्ष पूर्ण झाली. खूप कष्टात आम्ही दोघांनी स्वतःच्या हिंमतीवर आम्हाला जे पाहिजे ते मिळवले. आमच्या दोन्ही मुली तृप्ती आणि दिप्ती छान शिकल्या.आता दोन- दोन मुलांच्या आई झाल्यात. दोन्ही जावई प्रसाद व यश मुलापेक्षा जास्त जीव लावतात. आम्ही चार नातवंडात म्हणजेच दिया , रुशी, वीर आणि राधा यांच्या मध्ये रमून जातो. आज मी अभिनय, गायन, माॕडेलींग क्षेत्रात जे नाव कमवले ते फक्त आणि फक्त माझ्या प्रदिपच्या पाठिंब्यामुळेच. स्वामी समर्थांंची मी खूप आभारी आहे. त्यांनी माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली. “