देवमाणूस मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. दिव्या सिंगला डॉक्टर विरोधात पुरेसे पुरावे मिळाले नसून अजितकुमार आता पोलिसांच्या तावडीतून सुखरूप सुटणार आहे. त्यामुळे दिव्या सिंगची कामगिरी तुर्तास थांबली असून तिने शूटिंगमधून नुकतेच पॅकअप करून घेतले आहे. आपण देवमाणूस मालिकेत आता दिसणार नाहीत असेच भाकीत तिने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केले होते. त्यामुळे आता नेहा खानची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. नेहा खान च्या एक्झिटनंतर मात्र आता देवमाणूस मालिकेत एक आणखी ट्विस्ट येणार आहे.

मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना “माधुरी पवार” ची एन्ट्री होणार आहे. होय ही तीच माधुरी पवार आहे जिने तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्री काडगावकर हिने साकारलेली वहिनीसाहेब म्हणजेच नंदिता गायकवाडची भूमिका साकारली होती. माधुरी पवार ने झी युवा वरील अप्सरा आली या शोचे विजेतेपद पटकावले होते. लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड असलेल्या माधुरीला तिच्या वडिलांनीच प्रोत्साहन दिले होते. ज्या गावी काम त्या ठिकाणी माधुरी नृत्याचे धडे गिरवत होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मूळची साताऱ्याची असलेली माधुरी आपल्या खास लावणी नृत्यामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. दिलखेचक अदा आणि चेहऱ्यावरील हावभाव याचमुळे मधुरीचे लावणी नृत्य खूपच लोकप्रियता मिळवून गेले. टिक टॉक सारख्या अनेक व्हिडिओजमधूनही तिने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. नृत्यासोबतच अभिनयाचीही जाण तिला होती. तिची हीच आवड तिला तुझ्यात जीव रंगला मालिकेपर्यत घेऊन आला. यातून तिने विरोधी पात्र साकारले होते.

आता लवकरच माधुरीला आणखी एकदा अभिनयाची संधी मिळत आहे. आणि तीही चक्क देवमाणूस मालिकेतून . देवमाणूस मालिकेतून माधुरी एका दारू विक्री करणाऱ्या दुकानाच्या मालकिणीची भूमिका साकारणार आहे. तिचे हे पात्र मालिकेत काय काय नवे वळण घेऊन येणार हे पाहणे आता उत्सुकतेचे वाटणार आहे. कारण हे पात्र डॉक्टरला गोत्यात आणेल की तीच डॉक्टरच्या पाठीशी उभी राहणार हे पाहणे रंजक होणार आहे. तुर्तास मालिका निरोप घेणार नसली तरी मालिकेत घडणाऱ्या या सर्व घटना प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे त्यामुळे हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करताना दिसत आहे. तुर्तास अभिनेत्री माधुरी पवार हिला या नव्या मालिकेसाठी आणि तिच्या दमदार भूमिकेसाठी तिला खूप खूप शुभेच्छा…