लॉकडाउननंतर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या नवीन मालिकांमध्ये अनेक नवे चेहरेही झळकताना दिसताहेत. ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकारांनी अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. देवमाणूस मालिकेत अभिनेता किरण गायकवाड हा मुख्य भूमिका साकारत आहे. किरण गायकवाड हा लागिरं झालं जी मालिकेतून घराघरांत पोहोचला होता. डॉक्टर अजितकुमार देव हा मालिकेत अनेक गावकऱ्यांना लुबाडत असल्याचे दिसत होते. एवढ्यावरच न थांबता त्याने बरेच खून पण केलेले दिसत आहेत. आणि त्याच्या ह्या सगळ्या कामात त्याला डिंपल मदत करत होती. ‘डिंपलला सिम्पल राहायला आवडत’ असा डायलॉग मारणारी डिंपलची भूमिका साकरली आहे अभिनेत्री अस्मिता देशमुख हिनं.

ही मालिका जेवढी भीतीदायक वाटते तेवढीच ती मनोरंजक पण आहे. ह्या मालिकेतील सरू आजी नावच पात्र खूपच गाजल. सरू आजीच्या म्हणी सगळ्यांचच मनोरंजन करत होत्या. त्याचबरोबर ह्या मालिकेतील बालकलाकार विरल माने यानं ‘टोण्या’चं पात्र साकारलं आहे. त्याच्या गमती जमती सुद्धा प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन करतात. ‘देवमाणूस’ मालिका सध्या वेगळ्याच वळणावर आली आहे. मालिकेत आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवीसिंग आता तुरुंगात आहे. एसीपी दिव्या सिंगने प्रयत्न करून त्याच्या विरोधात अनेक पुरावे मिळवले आहेत. परंतु त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाहीए. एसीपी दिव्या गावात आल्यावर देविसिंग ने तिलाही आपल्या बाजूने करून घेतले होते. जेणेकरून ती त्याच्याविरोधात जाणार नाही. परंतु काही गोष्टींची लिंक लागताच झालेल्या खुनांमागे डॉक्टर अजितकुमार देवचा हात असल्याचे दिव्या सिंग ला समजले होते. आणि त्यावेळी दिव्या सिंग ने डॉक्टर अजित ला त्याच्या लग्नातून फरफटत नेत पोलीस स्टेशन पर्यंत त्याची वरात काढली होती. त्यामुळे एसीपी दिव्याने जीव तोडून मेहनत घेत पुरावे गोळा केले आहेत.

तिच्या या प्रयत्नांना सरकारी वकील आर्या देशमुखची साथ मिळणार आहे. या दोघी मिळून देवीसिंगचा मुखवटा फाडत त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. पण आता मालिकेत दिव्या सिंग आता दिसणार नाही. कारण दिव्याच्या जागी आता नवीन पोलिस अधिकारी मालिकेत दिसणार आहे. इन्स्पेक्टर शिंदे आता दिव्या सिंगच्या जागी या केसचा तपास करणार आहेत. आर्याची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील ही साकारत आहे. तर दिव्यासिंगच्या भूमिकेत नेहा खान आहे. ती आता मालिकेत दिसणार नसल्यानं चाहत्यानी नाराजी व्यक्त केली आहे. महेश मांजरेकर ह्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर बिग बॉस मराठी सिजण 3 चा प्रोमो शेअर केला आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे देखील समोर येत आहेत. बिग बॉस चा येणारा नवीन सीजन आणि सोबतच नेहा खान ची मालिकेतील एक्झिट, ह्यामुळे बिग बॉस मराठी मधे नेहा खान दिसणार का ह्या बद्दल तिच्या चाहत्यांनी उत्सुकता वाढलेली दिसून येतेय येणाऱ्या काही दिवसातच ते स्पष्ट होईल.