देवमाणूस २ या मालिकेचा पहिलाच भाग टीआरपी वाढवणारा ठरला होता. देवीसिंगच्या मृत्यूनंतर आता मालिकेत काय घडणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या बाबतीत अग्रेसर ठरली. अर्थात मालिकेच्या पहिल्या भागातच डॉ देवीसिंगच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी डिंपलच्या हस्ते डॉक्टरच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्याच वेळी जैसलमेर येथे देवीसिंग नटवरलाल सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतो. हातचलाखी करून तो तेथे लोकांना त्यांचे पैसे डबल करून दाखवतो.

तिथेच एक फॉरेनर उभी असते त्यावेळी आपल्या जवळची नोट नाटवरलालला देऊन ती नोट डबल करून दाखवण्यास सांगते. परदेशी चलनातली नोट पाहून देवीसिंग बुचकळ्यात पडतो मात्र त्यानंतर काही वेळातच तो ती नोट देखील डबल करून दाखवतो. त्याची ही जादू पाहून परदेशी महिला डॉक्टरच्या मागे लागते आणि मला ही जादू शिकव असे म्हणते. मी तुला त्याबदल्यात खूप पैसे देईल असेही ती म्हणते. मात्र त्यानंतर त्या फॉरेनरचा मृत्यू होतो हा मृत्यू डॉक्टरनेच घडवून आणला असेल अशी शंका प्रेक्षकांमध्ये निर्माण होते. ही फॉरेनर कोण आहे तीच नाव काय आहे याबद्दल जाणून घेऊयात… देवमाणूस २ मालिकेत पहिल्याच भागात पाहायला मिळालेल्या या अभिनेत्रीच नाव आहे “एलेना वेल्टर”. एलेना हि जर्मन असून भारतातील अनेक ठिकाणी ती ट्रॅव्हल करताना पाहायला मिळते. या पूर्वी देखील तिने काही जाहिरातीत काम केले आहे. हयात रेंजन्सी धर्मशाळा रिसॉर्ट च्या काही जाहिरातीत ती पाहायला मिळाली. पण अभिनय करताना देवमाणूस २ हि कदाचित तिची पहिलीच मालिका असावी.

एलेना वेल्टरहि अभिनय आणि जाहिरातीं व्यतिरिक्त सामाजिक कार्य देखील करताना पाहायला मिळते. अनेक एनजीओना ती नेहमी मदत करताना पाहायला मिळते. काही शाळांमध्ये देखील तिने लेक्चर दिलेले आहे. देवमाणूस मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता त्यामुळेच आता देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग देखील प्रसारित होताना पाहायला मिळाला. सत्य घटनेवर आधारित मालिका म्हणून अनेकांनी ह्या मालिकेला पसंती दर्शवली होती पण कथानक भरकटत असल्यामुळे मध्यंतरी हि मालिका प्रेक्षकांना रुचली नव्हती. त्यामुळेच मालिका अर्धवट दाखवून पुढे दुसऱ्या भागात पुन्हा “देवमाणूस २” मध्ये तरी प्रेक्षक या मालिकेला कितपत पसंती दर्शवतील हे येत्या काही भागातच पाहायला मिळेल. असो देवमाणूस २ मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..