Breaking News
Home / जरा हटके / देव माणूसमधील ‘या’ अभिनेत्रीने घेतली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची गाडी

देव माणूसमधील ‘या’ अभिनेत्रीने घेतली तब्बल १० लाखांहून अधिक किमतीची गाडी

अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या प्रत्येक कलाकाराचं एक वेगळं स्ट्रगल असतं. अनेक जणांना बरेच दिवस काम मिळत नाही. तसेच काहींना काम मिळूनही योग्य आर्थिक मोबदला मिळत नाही. या सर्व गोष्टी चित्रपटांप्रमाणेच मालिका कलाकारांमध्ये देखील पाहायला मिळतात. मात्र आता छोट्या पडद्यावर झळकणारे कलाकार देखील मोठे श्रीमंत झाले आहेत. त्यातीलच एका अभिनेत्री विषयी आणि तिच्या नव्या कोऱ्या महागड्या गाडी विषयी या बातमीतून जाणून घेणार आहोत.

actresss asmita deshmukh
actresss smita deshmukh

देव माणूस या सिरीयलमधील डिंपलला तुम्ही सर्वच जण ओळखत असाल. तिने या मालिकेच्या दोन्ही पर्वासाठी काम केलं आहे. डिंपल हे पात्र साकारत असलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे अस्मिता देशमुख. अस्मिताने नुकतीच एक चारचाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीचं नाव “किया कॅरन्स” असं आहे. तसेच तिची किंमत तब्बल १० ते १५ लाख रुपये इतकी आहे. आता अस्मिताने एवढी महागडी गाडी खरेदी केली आहे म्हटल्यावर नक्कीच तीला मालिकेतून भरगोस मानधन मिळत असेल अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. अस्मिताने तिच्या सोशलमीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत तिच्या नव्या गाडीची माहिती दिली. तिने गाडी बरोबरचा एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “न्यू फॅमिली मेंबर” अभिनेत्रीने ही गाडी स्वकमाईने घेतली आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावर तिचे खूप खूप अभिनंदन करत आहेत. तसेच तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अस्मिताच बालपण हे पुण्याचं. तिने तिथूनच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

asmita deshmukh new car
smita deshmukh new car

लहापणापासूनच ती शाळेतील सर्वच सांस्कृतीक कार्यक्रमात भाग घ्यायची. त्यानंतर महावद्यालयीन शिक्षण घेत असताना तिला नाटकातून अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यावेळी ती अनेक म्युजिक अल्बममध्ये झळकली होती. अशात देव माणूस या सिरीजमध्ये देखील तिने खूप सुंदर अभिनय केला. आपल्या अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली. तसेच पुढे देव माणूस २ मध्ये देखील ती झळकली. त्याचबरोबर नुकतेच ती पुन्हा एकदा काही म्युझिक अल्बममध्ये देखील दिसली होती. देवमाणूस या मालिकेत काम करत असताना तिने डिंपल या पात्राला पूर्णपणे न्याय दिला. या मध्ये डिंपल आणि टोण्या या दोघांच्या जुगलबंदीने कायमच रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यामुळेच पुढे या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात देखील तिला झळकण्याची संधी मिळाली. अस्मिताची देव माणूस ही तशी पहिलीच मालिका होय.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *