डिसेंबर महिन्यातील १९ तारखेच्या महाएपिसोड पासून देवमाणूस २ मालिका झी वाहिनीवर सुरु झाली. देवमाणूस मालिकेचा पुढील भाग म्हणून “देवमाणूस २” हि मालिका प्रक्षेपित होत आहे. सत्य घटनेवर आधारित देवमाणूस मालिका तुफान गाजली त्यामुळेच आता देवमाणूस २ झी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणली. मालिकेत सरूआजी आणि आणि टोण्या यांच्या सोबतच लालामामाचा अभिनय देखील भाव खाऊन गेला. मालिकेतून सरू आजीसोबतचे लालामामाचे वाद आणि त्यातून निर्माण हेणारे विनोद प्रेक्षकांनाही हसवून गेले. लालामामा साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे “डॉ शशिकांत डोईफोडे.”

डॉ शशिकांत डोईफोडे यांनी देवमाणूस मालिकेत सरू आजीच्या जावयाची म्हणजेच “लालामामांची” भूमिका साकारली आहे. कदाचित तुम्हाला हे माहित नसेल कि लालामामा साकारणारे शशिकांत डोईफोडे हे खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहेत. साताऱ्यातील पळशी येथील त्यांचे मूळ निवासस्थान कोल्हापूर येथील मेडिकल कॉलेज मधून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. सुरुवातीपासूनच कलाक्षेत्राची ओढ असलेल्या शशिकांत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करायचा निर्णय घेतला. २००९ ते २०१७ या काळात त्यांनी सलग सहा चित्रपट बनवले आणि ते रिलीजही केले. “आमदार माझ्या खिशात” हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. “नवरा पंच बायको सरपंच”, “कसं काय मामा बरं हाय का”, “टेंडल्या निघाला ऑस्करला”, “बालाजी सांभाळ माझ्या बाळाला” अशा सामाजिक, राजकीय विषयाला हात घालून त्यांनी हे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले. सयाजी शिंदे, मोहन जोशी, सतीश तारे, सुरेखा कुडची अशा नामवंत कलाकारांना घेऊन त्यांनी हे चित्रपट बनवले. “ग्रेट माय इंडिया” हा पहिला 3D मराठी बालचित्रपट तसेच “व्हायरल” हा हिंदी चित्रपटदेखील त्यांनी बनवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

“देवमाणूस २” मालिका सुरु झाली सरू आजी आणि टोण्या मालिकेत रंग भरताना पाहायला मिळतात पण लालामामा मालिकेत दिसत नाहीत लालामामा शिवाय देवमाणूस मालिकेत खरी मजा येत नाही असा सवाल अनेकजण विचारताना पाहायला मिळतात. पण आता लालामामा मालिकेत न दिसण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे. डॉ शशिकांत डोईफोडे हे स्वतः निर्माते आणि दिग्दर्शक आहेत त्यांची अनेक प्रोजेक्ट सध्या सुरु आहेत. “ग्राफी” या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या सुटिंगमध्ये ते व्यस्त आहेत. याशिवाय त्यांचा आणखीन एका मराठी चित्रपटच शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. आपल्या बिझी शेड्युलमुळे त्यांना देवमाणूस २ मध्ये एन्ट्री करता आली नाही. पण येणाऱ्या काही दिवसात ते पुन्हा मालिकेत पाहायला मिळतील अशी आशा आहे. असो अभिनेते डॉ शशिकांत डोईफोडे यांना त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांसाठी खूप खूप शुभेच्छा…