झी मराठी वरील देवमाणूस मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला पण मालिकेचा शेवट मात्र झाला नव्हता त्यामुळे लवकरच याचा दुसरा भाग प्रकाशित होणार अशी चिन्हे पाहायला मिळत होती. काही दिवसांपासून देवमाणूस २ मालिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळाली आणि आता त्यावर देवमाणूस २ ची एक क्लिप झी वाहिनीने प्रक्षेपित करून ह्यावर शिक्कामोर्तब देखील केला आहे. मालिकेत मागील भागच आता पुढे पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे जुने कलाकाराचं पुन्हा पाहायला मिळतील अशी दाट शक्यता आहे. देवमाणूस मालिकेत टोण्या आणि सरू आज्जी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

मालिकेतील सर्वच पात्र साकारणाऱ्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिकेत चांगलाच रंग भरला त्यामुळेच टीआरपी मध्ये देखील हि मालिका प्रथमस्थानी असलेली पाहायला मिळाली. मालिकेचा शेवट मात्र लेखकाला नीट करता आला नसल्याने अनेकांची हिरमोड झाली होती. आता हि मालिका पुन्हा सुरु होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मालिकेत विजय शिंदे हे पात्र साकारणारा अभिनेता एकनाथ गीते ह्याने देखील उत्तम अभिनय साकारला होता. या मालिके आधी देखील त्याने बरीच कामे केली आहेत पण देवमाणूस मालिकेमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तू अशी जवळी रहा, प्रेमा तुझा रंग कसा, जागते रहो महाराष्ट्र, श्री गुरुदेव दत्त, देव पावला, घेतला वसा टाकू नको अश्या अनेक मराठी मालिकांत त्याने कामे केली आहेत. तांडव सारख्या मराठी चित्रपटातून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण खरी प्रसिद्धी त्याला देवमाणूस ह्या मालिकेतूनच मिळालेली पाहायला मिळते. देवमाणूस मालिकेतील विजय शिंदे साकारणारा हा अभिनेता म्हणजेच अभिनेता एकनाथ गीते हा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे हि एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दिसून येत. नुकतंच सोशिअल मीडियावर ह्या दोघांनी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली देखील दिली आहे.

अभिनेता एकनाथ गीते हा अभिनेत्री त्रिशा कमलाकर हिच्या प्रेमात आहे. स्टार प्रवाहवरील प्रेमा तुझा रंग कसा या मालिकेत दोघांनी एकत्रित काम देखील केलं आहे . या मालिकेमुळेच या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. सोशिअल मीडियावर तुम्हाला ह्या दोघांचे अनेक फोटो आणि विडिओ देखील पाहायला मिळतील. अभिनेत्री त्रिशा कमलाकर हि एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय तिने शास्त्रीय संगीताचे धडे देखील गिरवले आहेत. नुकतंच दोघांनी एकमेकांसोबतचा फोटो शेअर करत २०१८ पासून २०२१ चे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. चाहत्यांनी देखील ह्यावर तुम्ही लवकर लग्न करा अश्या अनेक कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. देवमाणूस २ ह्या मालिकेमुळे पुन्हा एकदा अभिनेता एकनाथ गीते हा चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा देवमाणूस मालिकेत तो डॉक्टर च्या विरोधात काय करणार आणि डॉक्टरला पकडण्यात तो कशी मदत करणार हे येत्या काही भागात पाहायला मिळणार आहे. असो अभिनेता एकनाथ गीते याला देवमाणूस मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा..