Breaking News
Home / राजकारण / देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

देवमाणूस नाही तर ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

गेल्या काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहीनिवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागातही पोलिसांना मुंबईत जाऊन डॉक्टर अजितकुमारच खरा देवीसिंग असल्याचा तपास लागला होता. त्यासंबंधीची सर्व शहानिशा करूनच दिव्या सिंगला पोलिसांनी फोन करून ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने तो पोलीस डिंपल आणि डॉक्टरच्या जाळ्यात अडकला आणि त्याने केलेला देवीसिंग बाबतचा सर्व उलगडा त्याच्यासहित नष्ट झाला. या गोष्टींमुळे मालिका उत्कंठावर्धक झालेली पाहायला मिळाली त्याचप्रमाणे आता डॉक्टरांचा खरा चेहरा गावसमोर येईल आणि त्याची कटकारस्थाने बंद होतील असेही प्रेक्षकांना वाटत होते.

kay ghadl tya ratri
kay ghadl tya ratri

दरम्यान पोलीस डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्याने मालिकेला एक मोठे वळण लागलेले पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका तुर्तास तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नाही यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला. मुळात सरू आज्जी, नाम्या, बज्या, टोण्या यासर्वांच्या अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली त्यामुळे मालिकेचा टीआरपी देखील निश्चितच वाढण्यास कामी आला. याच पार्श्वभूमीवर आणि लोकप्रियतेमुळे मालिका तुर्तास तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार नसल्याचे त्यांनी येते. परंतु लवकरच झी मराठी वाहिनीवर एक रिऍलिटी शो प्रसारित केला जाणार आहे त्यासाठीची लगबग आणि ऑडिशनची तयारीही जोरदार सुरू झालेली पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिणीवर आता लवकरच पुन्हा एकदा “सारेगमप लिटिल चॅम्पस ” हा शो सुरू होणार आहे त्यामुळे झी वाहिनीची एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. प्रेक्षकांचा निरोप घेत असलेली ही मालिका आहे “काय घडलं त्या रात्री”. काय घडलं त्या रात्री ही मालिका आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतील इन्स्पेक्टर रेवती बोरकर हिला सिद्धांत छायाच्या प्रकरणात योग्य ती दिशा मिळताना दिसत आहे लवकरच याचा छडा लागणार असल्याने मालिका आता आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. येत्या काही दिवसातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे स्पष्ट होईल आणि त्याजागी सारेगमप लिटिल चॅम्प्स शो प्रसारित केला जाईल. सारेगमपच्या पहिल्या पर्वातील आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे या पाचही जणांचा आजही बोलबाला पाहायला मिळतो आजही त्यांना लिटिल चॅम्प्स अशीच ओळख मिळते आहे. त्यामुळे लिटिल चॅम्प्सच्या या नव्या पर्वाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *