
देवमाणूस मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका ठरली आहे त्यातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलेले दिसून येते. टोण्या आणि डिम्पलच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून तर भरभरून प्रेम मिळाले असल्याने या बहीण भावाच्या जोडीला या मालिकेत विशेष स्थान दिले आहे. आता तर टोण्याच्या पात्राला झी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणूनही पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे टोण्याचे पात्र साकारणारा “विरल माने” भलताच खुश झाला आहे. आपल्या भूमिकेला प्रेक्षकांनी आपलेसे केले हीच त्याच्या अभिनयाची मोठी पावती ठरवून गेली आहे.

टोण्या प्रमाणे डिंपलचा देखील आनंद द्विगुणित झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. डिम्पलची भूमिका साकारणारी अभिनेत्री “अस्मिता देशमुख” ही एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एव्हरेस्ट प्रस्तुत आणि अनिकेत बारावकर दिग्दर्शित “खुळ लागलं” या अल्बममधून अस्मिता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अंकित गवळी आणि अस्मिता हा नवा अल्बम साकारत असून या गाण्याला गायक रोहित राऊतने स्वरबद्ध केले आहे. या गाण्याचे पोस्टर लॉंच झाले असून प्रेक्षकांना त्याचा टिझरही लवकरच पाहायला मिळेल. लागीर झालं जी मालिकेतील शितली आणि आज्याची जोडी अशाच एका म्युजिक व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता आली होती. त्यांच्या अल्बमलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. अशाच पद्धतीने अस्मिताच्याही या नव्या गाण्याला प्रेक्षक चांगली पसंती दर्शवतील अशी आशा आहे. पण त्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अस्मिताने साकारलेली डिंपल प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे त्याचप्रमाणे तिच्या या गाण्यावर देखील प्रेक्षक तितकेच प्रेम देतील तुर्तास या नव्या गाण्यासाठी अस्मिता देशमुख आणि अंकित गवळीला खूप खूप शुभेच्छा…