Breaking News
Home / जरा हटके / देवमाणूस २ मालिकेत या नव्या अभिनेत्रीची एन्ट्री दिसते खूपच सुंदर

देवमाणूस २ मालिकेत या नव्या अभिनेत्रीची एन्ट्री दिसते खूपच सुंदर

झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस २ या मालिकेत नुकतीच निलमने एक्झिट घेतली आहे. निलम प्रेग्नंन्ट आहे त्यामुळे डॉक्टर तिचा काटा काढण्याचा प्रयत्न करत असतो मात्र डॉक्टरला नेहमी मदत करणारी डिंपलच निलमचा काटा काढण्यात यशस्वी होते आणि ती डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढते. अर्थात डॉक्टरकडून पैसे मिळावेत म्हणूनच तिने हे कृत्य केलेले असते. अशातच आता मालिकेतून नव्या नायिकेची म्हणजेच सोनूची एन्ट्री झाली आहे. ही सोनू डॉक्टरला ‘डॉक्टर अंकल ‘ बोलते म्हणून अजितकुमारची झोप उडालेली असते.

vaishanavi kalyankar actress
vaishanavi kalyankar actress

सोनूला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी तो अधिक तरुण दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात आणखी एक विशेष बाब म्हणजे सोनू डॉक्टरांकडे मदत मागायला आलेली असते असे डिंपल डॉक्टरला सांगते त्यामुळे ही सोनू डॉक्टरच्या जाळ्यात नक्कीच अडकणार हे भाकीत वर्तवले जात आहे अर्थात मालिकेतून अशीच कारस्थानं प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहेतच. आज सोनूची भूमिका साकारणाऱ्या नायिकेबद्दल जाणून घेऊयात… देवमाणूस २ मालिकेत सोनूची भूमिका अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर साकारत आहे. वैष्णवी कल्याणकर ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील आहे. खेमराज मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कुल तसेच डी जी रुपारेल कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. अभिनयासोबतच वैष्णवी अभ्यासात देखील खूप हुशार आहे. बारावी इयत्तेत २०१८ साली ‘ऑडिटिंग अँड अकौंटिंग’ या व्यावसायिक अभ्यासक्रमात वैष्णवीने ९०.४६% गुण मिळवून कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढे डी जी रुपारेल कॉलेजमध्ये असल्यापासूनच वैष्णवीने एकांकिका आणि नाट्य स्पर्धांमधून सहभाग दर्शवला होता.

actress vaishanavi kalyankar
actress vaishanavi kalyankar

आम्ही मालवणी गुप आयोजित ऑनलाइन एकपात्री स्पर्धेमध्ये वैष्णवीच्या अभिनयाला नावाजले गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून म्युजिक व्हिडिओमध्ये झळकण्याची संधी मिळत गेली. धर्मा क्रिएशनस यांची ‘शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील ‘ या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यात वैष्णवीने मुख्य भूमिका साकारली आहे. वेबसिरीजच्या माध्यमातून वैष्णविला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. अभिनयासोबतच वैष्णवी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा घेते ज्यातून अनेक मुलांना तिने प्रशिक्षण दिले आहे. ऍक्सिस बँकेत असिस्टंट मॅनेजर या पदावर ती कार्यरत आहे. देवमाणूस २ या मालिकेतून प्रथमच तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेसाठी वैष्णवी कल्याणकर हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *