देऊळ बंद हा मराठी चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राघव शास्त्रीची मुलगी अर्थात बालकलाकार आर्या घारे आज एका अनोख्या कार्यामुळे चर्चेत येत आहे. आर्याने आजवर देऊळ बंद या चित्रपटा खेरीज अ ब क, पोस्टर गर्ल, बंदिशाळा अशा अनेक चित्रपटातून काम केले आहे. आर्या गेल्या अनेक वर्षांपासून एक उपक्रम राबवत आहे त्याची दखल नुकतीच घेतली असल्याने आर्या सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चालतात मग पाहुयात तिने नक्की काय केलाय ज्यामुळे तीच होतंय कौतुक …

आर्या घारे ही पुण्यातील मोशी, प्राधिकरण परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ती अखंडपणे वृक्षारोपणाची मोहीम चालवत आहे. परंतु यावर्षी तिने थोडं वेगळेपण जपावं म्हणून लोकांकडून बिया मागवल्या आहेत आणि त्या बदल्यात त्यांना एखादं रोपटं भेट म्हणून देणार आहे. आपण खाल्लेल्या फळांच्या बिया देऊन त्याबदल्यात तिच्या कडून रोप मिळणार असल्याने तिच्या या उपक्रमाला अल्पावधीतच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आर्याला यासंदर्भात रोज अनेक फोन कॉल येत आहेत शिवाय तिच्या उपक्रमाचे कौतुक देखील करत आहेत. अनेकांनी या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून बियांचे पार्सल पाठवले आहेत. आर्या म्हणते, ज्या लोकांकडे जागेचा अभाव आहे त्यांनी मी दिलेली रोपे ओसाड डोंगरावर जाऊन लावावीत जेणेकरून हा उपक्रम सत्कारणी लागेल. काही दिवसांपूर्वी आर्याने सामाजिक भान जपणारे आमदार निलेश लंके यांच्या पारनेर येथील को’वि’ ड सेंटरला जाऊन भेट दिली होती. तिथे जाऊन तिने आपल्या उपक्रमाची माहिती निलेश लंके यांना सांगितली त्यांनीही आर्याच्या या कार्याची दखल घेऊन जनतेला आवाहन करून तिच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. एवढ्या लहान वयात मुलांना निसर्गाविषयी प्रेम वाटते हे पाहून आमदार निलेश लंके यांनी आर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे व तिच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.