
अभिनेत्री दीपाली सय्यदने तिचा नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद या गेली अनेक वर्षे अभिनय क्षेत्रातून बाजूला आहेत. अर्थात राजकारणाची ओढ असल्याने त्यांनी याच क्षेत्रात सक्रिय होण्याचे ठरवले. यातून अनेक सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेली आहेत. कोल्हापूर, कोकण पूर परिस्थितीत त्यांनी अनेक मुलींची लग्न स्वखर्चाने लावून दिली होती. एवढंच नाही तर महिला कुस्तुपटूसाठीही त्यांनी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दीपाली सय्यद या गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय झालेल्या पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतलेला दिसला. पण आता दीपाली सय्यद हॉटेल व्यवसायात उतरलेल्या पाहायला मिळत आहेत.

नवीन वर्षाची नवी सुरुवात म्हणत शिर्डी येथे “मनी हॉटेल अँड रेस्टोरंट” या नावाने त्यांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. शिर्डी हे साईबाबांच्या भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दररोज हजारोंच्या संख्येने इथे भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आता. त्यामुळे देशभरातून, परदेशातून येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी प्रशस्त आणि सुखसोयींनीयुक्त रुम्स तिने या हॉटेलमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी तिच्या या हॉटेलला सदिच्छा भेट दिलेली पाहायला मिळाली.

मनी हॉटेल हे अगदी प्रशस्त एरियात बांधण्यात आलं आहे. इथली सजावट पाहून आणि त्याचं देखणं रूप पाहून त्याची भव्यदिव्यता लक्षात येते. त्यामुळे या रेस्टोरंटमध्ये राहण्यासाठी तुम्हाला भली मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. तेव्हा सर्व सुखसोयींनीयुक्त अशा दीपाली सय्यदच्या या रेस्टोरंटला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ना!…