संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचे आयुष्यावर बोलू काही चे सर्वच शो खूपच हिट झाले. त्यानंतर संदीप खरे ह्यांनी अभिनित केलेला दमलेल्या बाबाची कहाणी हा चित्रपट २०१६ साली रिलीज झाला. ह्या चित्रपटही गाणी तसेच चित्रपट देखील लोकांनी आवडीने पाहिला, चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं. चित्रपटात संदीप खरे, दीप्ती भागवत ह्यांसोबत एक नवीन चेहरा झळकला त्या मुळीच नाव आहे श्रेया पासलकर. श्रेया हि एक उत्तम गायिका देखील आहे तिने गायनाचे अनेक स्टेज शो देखील केले आहेत.

वयाच्या ६ व्या वर्षांपासून श्रेया नाटकांत काम करतेय. “दमलेल्या बाबाची कहाणी”, “वाघेऱ्या”, “खुर्ची”, “गेट टूगेदर अश्या अनेक मराठी चित्रपटांत तिने भूमिका साकारल्या आहेत. तर नटसम्राट ह्या मराठी नाटकात तिने दमदार भूमिका साकारली होती. पांडुरंगाची कृपा ह्या अल्बममध्ये देखील ती झळकली. सध्या ती एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तिची प्रमुख भूमिका असलेला “भंवर” हा हिंदी चित्रपट काही दिवसातच रिलीज होतोय. अतुल कुलकर्णी ह्यांच्यासोबत एका जाहिरातीत ती पाहायला मिळतेय. श्रेया पासलकर हि पुण्याची असून आई पल्लवीताई पासलकर ह्या राजकारणात सक्रिय असलेल्या दिसून येतात. श्रेया पासलकर हि एक उत्तम गायिका देखील आहे शिवाय तिला पियानु आणि हार्मोनियम वाजवायची देखील आवड आहे. हभप. रघुनाथ खंडाळकर ह्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. श्रेया पासलकर हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा …
