Breaking News
Home / जरा हटके / डॅडीचे नाव पुन्हा एकदा मुंबई गाजवणार कारण लवकरच येत आहे दगडी चाळ २

डॅडीचे नाव पुन्हा एकदा मुंबई गाजवणार कारण लवकरच येत आहे दगडी चाळ २

मुंबईच्या दहशतीमधलं एक नाव म्हणजे अरुण गवळी. नजरेच्या आगेने सारं काही राख करून टाकणाऱ्या अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या हुकुमतवर आधारीत दगडी चाळ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दगडी चाळ या चित्रपटाने डॅडी आणि दगडी चाळीत असलेलं वास्तव समोर आणलं. या चित्रपटाचा एक टिझर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता अंकुश चौधरी याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर टिझर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ankush chaudhari dangdi chawl 2
ankush chaudhari dangdi chawl 2

तसेच पुढे त्याने लिहिले आहे की, ” डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी.. गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’!” सध्या सोशल मीडियावर हा टिझर व्हिडिओ खूप व्हायरल होत. या व्हिडिओमध्ये बाकीचे कोणतेच कलाकार दिसले नाही. फक्त अरुण गवळी यांची एन्ट्री इथे दाखवण्यात आली आहे. टिझर नंतर आता ट्रेलर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.दगडी चाळ २ या चित्रपटात देखील आधीचे सर्व कलाकार अभिनय करणार आहेत. यामध्ये मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी, पूजा सावंत हे मुख्य भूमिकेत दिसतील. दगडी चाळ या चित्रपटात सुर्या आणि सोनल या दोघांची लवस्टोरी दाखवण्यात आली होती. दोघे एकाच चाळीत राहत असतात. काही दिवसांनी ते लग्न करतात संपूर्ण चित्रपट या लव स्टोरीमध्ये आहे. सुर्या हा एक सामान्य घरातला मुलगा असतो. अचानक त्याच्या आयुष्यात एक घटना घडते. या घटनेने त्याला अंडरवर्ल्डची दुनिया आपलीशी करावी लागते. तो स्वतः या दुनियेत येत नाही. त्याला ओढून इथे आणलं जातं. असं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. अशात आता या चित्रपटाच्या पार्ट २ मध्ये सुर्याच्या आयुष्याची पुढची स्टोरी असणार आहे.

dagadi chal 2 movie
dagadi chal 2 movie

तो आता नेमका कुठे राहतो आहे. दगडी चाळीत राहत असेल तर त्याच पुढचं जीवन कसं झालं आहे. या सर्व गोष्टींची उत्तर दगडी चाळ २ मध्ये मिळणार आहेत. २ ऑक्टोबर २०१५ रोजी दगडी चाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील मन धागा धागा या गाण्याने अनेक तरुण तरुणींना वेड लागलं होतं. तसेच चित्रपटातील मोरया मोरया हे गाणं देखील खूप गाजलं होतं. आता या चित्रपटाच्या येणाऱ्या दुसऱ्या भागात देखील अशीच हिट गाणी असतील यात काही शंकाच नाही. चंद्रकांत कणसे दिग्दर्शीत दगडी चाळ या चित्रपटाने त्यावेळी ३७ कोटींचा गल्ला जवला होता. आता आणखीन नव्या अंदाजात हा चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहते आणखीन उस्तुक आहेत. तसेच हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *