विनोद कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वादग्रस्त भूमिकेमुळे चांगलेच चर्चेत येऊ लागले आहेत. आपल्या फ्लॅटच्या पार्किंगमध्ये एका इसमासोबत त्यांनी हुज्जत घातली होती. दारूच्या नशेत असल्यामुळे विनोद कांबळी यावेळी चर्चेत आले होते. या घटनेनंतर विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दारूच्या नशेत असताना विनोद कांबळी यांचे पत्नी सोबत भांडण झाले. त्यांचे हे भांडण इतके विकोपाला गेले की कांबळी यांनी किचनमध्ये असलेला एक कुकिंग पॅन उचलून पत्नीच्या डोक्यावर फेकून मारला. यामुळे विनोद कांबळी यांची पत्नी अँड्रीया यांच्या डोक्याला दुखापत झाली. हे भांडण चालू असताना कांबळी यांचा मुलगा तिथेच उभा होता. कुकिंग पॅन मारू नका म्हणून त्याने वडिलांना विरोध केला होता.

दरम्यान ही दुखापत झाल्यानंतर अँड्रीया यांना दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दारूच्या नशेत विनोदने आपल्याला मारहाण केली असा आरोप त्यांनी पोलिसांकडे दाखल केला. वांद्रे पोलिसांनी त्यांची ही तक्रार नोंद केली असून विनोद कांबळी यांच्यावर कलम ३२४ आणि कलम ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान हा सर्व प्रकार विनोद कांबळी यांच्या फ्लॅटमध्ये घडला होता. मात्र आता हे प्रकरण मिटलं असल्याचा दावा अँड्रीया यांनी केला आहे.अँड्रीया ही विनोद कांबळी यांची दुसरी पत्नी आहे. १९९८ साली विनोद कांबळी यांनी नोएला लुईस सोबत पहिला प्रेमविवाह केला होता. नोएला ही पुण्यातील ब्लु डायमंड हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. मात्र लग्नानंतर काही वर्षातच या दोघांचे बिनसले आणि लगेचच घटस्फोट घेण्याचे ठरवले. त्यानंतर अँड्रीया हेवीट या मॉडेलसोबत त्यांनी दुसरे लग्न केले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर विनोद कांबळी यांनी काम मिळावे म्हणून मागणी केली होती. प्रशिक्षक म्हणून मला काम करण्याची संधी दिली तर माझ्या कुटुंबासाठी ती एक मदत होईल असे त्याने त्यावेळी म्हटले होते. असे असले तरी जवळपास विनोद कांबळी यांना ३० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते.

क्रिकेटर विनोद कांबळी यांना याच ३० हजार रुपयातून त्याच्या घराचा खर्च भागवला जातो. मी तरुणांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो मला काम द्या असे त्याने गेल्या वर्षी म्हटले होते. यानंतर एका खाजगी कंपनीकडून विनोद कांबळी यांना चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळाली होती. परंतु अशा काही घटनांमुळे विनोद कांबळी वारंवार वादाच्या विळख्यात अडकत आहेत. सचिनला माझी सर्व परिस्थिती माहिती आहे पण मला त्याच्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा नाही असेही त्याने म्हटले होते. निवृत्ती वेतन सोडून काही स्पोर्ट चायनल साठी विनोद कांबळी अधूनमधून कॉमेंटरी करताना देखील पाहायला मिळतो. त्या त्यातून त्याला बऱ्यापैकी पैसे देखील मिळतात पण आता बऱ्याच दिवसांपासून अनेक क्रिकेटर कायमस्वरूपी कॉमेन्टरी करताना पाहायला मिळत असल्याने विनोद कांबळी याच्या अडचणी वाढल्या आहेत.