
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टार असलेला ‘पुष्पा द राइज’ ह्या चित्रपटाची सोशिअल मीडियावर तुफान चर्चा रंगतेय त्याच कारण देखील अगदी तसाच आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन डेविड व़ॉर्नरला देखील मोह आवरला त्याने. त्याने चक्क साऊथ स्टाईलमध्ये मेकअप करून तेथील लोकांच्या सोबत एक जबरदस्त डान्स केलेला एक व्हिडिओ नुकताच सोशिअल मीडियावर अपलोड केला आहे. त्याच्या ह्या डान्स व्हिडिओमुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या स्टेप्स प्रमाणेच त्याने डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने साउथ इंडियन सुपरस्टार च्या मुव्हमेंट कॉपी करत हा दिलखुलास डान्स केला आहे. भारतीयाचीच नाही तर ऑस्ट्रेलियातील त्याचे चाहते देखील त्यावर रिऍक्ट होऊन त्याला प्रोत्साहन देत केलेल्या डान्सस्टाईलची शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ज्या गाण्यावर वॉर्नरने डान्स केला तो चित्रपट पुष्पा द राइज असून त्यातील ‘आई बिड्डा इधि ना अड्डा’ हे तामिळ भाषेतील गाणं आहे. पुष्पा द राइज हा चित्रपट याच आठवड्यात म्हणजेच १७ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील हिरो अल्लू अर्जुन प्रमाणे गेटअप करत त्याच्यासारख्याच स्टेप करत धमाल केली आहे. त्याचा हा विडिओ पाहत विराट कोहलीने “मित्रा तू ठीक आहेस ना” असं हसत म्हटलं आहे. तर मायकल जॉन्सन याने आता पुरे कर मित्रा असं म्हटलं आहे. त्याला प्रतिउत्तर देत डेव्हिड वॉर्नर म्हणतो “आता मी हे थांबवू शकत नाही” असं म्हणतो. अनेक क्रिकेटर्स आणि बॉलीवूड सुपरस्टार लोकांनी देखील त्याला प्रोत्साहन दिल आहे. इतकंच काय तर खुद्द अल्लू अर्जुनने देखील असा गेटअप आणि डान्स पाहून आश्चर्य व्यक्त करत वॉर्नरचे आभार मानले आहेत.

अनेकांना कदाचित हे माहित नसेल कि माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेता श्रेयश तळपदे याने पुष्पा द राइज या हिंदीतील चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला आवाज दिला आहे. नुकताच त्याने सोशिअल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. त्याने व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारतातील सर्वात ताकदवान आणि स्टायलिश अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हिंदीमध्ये आवाज असल्याचा मला खूप आनंद आणि सन्मान वाटतो.लायन किंग नंतरचा हा माझा दुसरा हिंदी डब आहे पण तेलुगु फीचर फिल्मसाठी माझा पहिलाच डब आहे. अल्लू अर्जुनच्या अभूतपूर्व मेहनतीला न्याय देण्याचा माझ्या स्वत:च्या छोट्या मार्गाने प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला ते आवडेल. कृपया चित्रपट पहा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते मला कळवा.” या चित्रपटात श्रेयसचा आवाज आहे हे कळताच त्याचे चाहते देखील मोठा आनंद व्यक्त करत आहेत.