“संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस.” ही चारोळी वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की, या बातमीतून आपण एका यशस्वी व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत. तर आज या बातमीतून भारतीय क्रीडा क्षेत्रातील क्रिकेट विश्वात मोठं नाव कमवणाऱ्या यशस्वी जैस्वालचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ. २०१९ साली झारखंडविरुद्ध झालेल्या एका सामन्यात त्याने १५४ चेंडूंत २०३ धावा केल्या होत्या. यावेळी तो चांगलाच लाईम लाईटमध्ये आला. आजवर त्याने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आहेत.

सचिन तेंडुलकर प्रमाणे आपणही क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवावं असं स्वप्न उराशी बाळगून यशस्वी मुंबईमध्ये आला होता. तो मध्यप्रदेशमधील एका छोट्या गावात आणि सामान्य कुटुंबातील मुलगा होता. आपलं एवढं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्वप्न नागरी मुंबईत प्रवेश केला खरा, मात्र त्याचा प्रवास तितका सोपा नव्हता. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्याने मुंबई गाठली. आता मुंबईमध्ये आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी काही तरी काम केलंच पाहिजे. त्यामुळे त्याने सुरुवातीला कळबादेवी या डेरीमध्ये एक नोकरी मिळवली. इथे काम करुन तो क्रिकेटचा सराव करायचा. सराव करत असताना तो खूप थकून जायचा. त्यामुळे पुन्हा डेरीमध्ये काम करणं त्याला कठीण जात होतं. काही दिवसांनी त्याने ते काम सोडून दिलं. त्यानंतर त्याने मुंबईच्या प्रसिद्ध आझाद मैदानात बराच काळ सराव केला. याचं मैदानात त्याने अनेक रात्र काढल्या. त्यावेळी त्याच्याकडे साधं झोपण्यासाठी पुरेसं पांघरुन देखील नव्हतं. डोक्यावर छत नाही खाण्यासाठी पुरेस अन्न नाही पिआयला पुरेस पाणी नाही. मात्र मनात जिद्द कायम होती. त्यावेळी त्याने याच मैदानाच्या परिसरात पाणीपुरीची गाडी लावली.

आपल्या ओळखीचे खेळाडू त्यावेळी तिथे येऊ नयेत असं त्याला नेहमी वाटायचं. मात्र अनेक ओळखीच्या व्यक्ती तिथे यायच्या. त्यावेळी त्याला खूप लाज वाटायची. पण चोरी करण्याची लाज असावी, कामाची नसावी असं म्हणत त्याने बरेच दिवस पाणीपुरी विकली. पण ते म्हणतात ना संघर्षाला हवी साथ. तशीच साथ यशस्वी जैस्वालला देखील मिळाली. एका न्युज चायनलला जेंव्हा हि गोष्ट कळली तेंव्हा त्यांनी हि बातमी पेपरमध्ये छापली. हि बातमी समजताच ज्वाला सिंग नावाच्या एका कोचने त्याला विनामूल्य क्रिकेटच शिक्षण दिलं. आणि मग काय यशस्वीच्या संघर्षाचं जहाज खऱ्या अर्थानं यशाकडे वाटचाल करू लागलं. अंडर १९ च्या विश्वचषक सामन्यात त्याने ४०० हुन अधिक धाव ठोकल्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने १०५ भाव केल्या. अंडर १९ च्या विश्वचषक सामन्यात ३०० धावांचा पल्ला देखील कोणी गाठला नाही पण त्यामुळे राहुल द्रविडने देखील त्याच तोंडभरून कौतुक केलं होत. आयपील सामन्यात देखील त्याला राजस्थान संघाकडून खेळायची संधी मिळाली. त्याचा खेळ पाहून मागील वर्षी त्याला मुंबईच्या संघाने तब्बल ४ कोटी रुपयांना खरेदी केलं. त्याची खेळाबद्दची आवड आणि मेहनत पाहता लवकरच तो भारतीय संघात देखील सामील होईल अशी आशा खुद्द राहुल द्रविड याने व्यक्त केली होती.