serials

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींची मालिकेत एन्ट्री…प्रथमच आई आणि २ मुली करणार एकत्र काम

मराठी वाहिन्यांच्या स्पर्धेत सन मराठी वाहिनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. अशातच आता या वाहिनीवर “कॉन्स्टेबल मंजू” ही नवीन मालिका प्रसारित करत आहे. येत्या १८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वैभव कदम आणि मोनिका राठी जोशी हे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर या मालिकेत आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोबतच या अभिनेत्रीच्या जुळ्या मुलींनाही या मालिकेतून अभिनयाची एकत्रित संधी मीळणार आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच लागीरं झालं जी मालिकेतील पुष्पा मामी म्हणजेच अभिनेत्री विद्या सावळे होय.

vidya sawale daughters in constable manju serial
vidya sawale daughters in constable manju serial

नाटकातून काम करत असतानाच विद्या सावळे यांनी चित्रपट, मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. पण लागीरं झालं जी मालिकेतील पुष्पा मामीच्या भूमिकेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती. खरं तर या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. कालांतराने वाद झाल्यामुळे त्यांनी या मालिकेतून काढता पाय घेतला होता. पण असे असले तरी पुढे त्यांना विविध वाहिन्यांनी अभिनयाची संधी मिळवून दिली. आता विद्या सावळे सन मराठीच्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतून ‘मम्मी साहेबांची’ भूमिका साकारत आहेत. त्याच जोडीला त्यांच्या जुळ्या मुलींना देखील या मालिकेतून अभिनयाची संधी मीळणार आहे. ‘सवी कवी’ अशा जुळ्या बहिणींच्याच भूमिकेत या दोघीही एकत्र पाहायला मिळणार आहेत.

constable manju new marathi serial actress
constable manju new marathi serial actress

विद्या सावळे या सिंगल मदर आहेत. नेहा आणि निकिता या त्यांच्या जुळ्या मुली आहेत. या मालिकेत येण्यापूर्वी नेहाने कलर्स मराठीच्या सिंधुताई माझी माई या मालिकेत अभिनय केला होता. त्यात तिला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेतूनच नेहाने आई विद्या सावळे यांच्यासोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. पण आता नेहा , निकिता आणि विद्या सावळे या मायलेकी एकत्रितपणे छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रेक्षक देखील मम्मी साहेब आणि सवी कवी ला एकत्रित पाहण्यासाठी तेवढेच उत्सुक असणार आहेत. मालिकेत या तिघींची भूमिका नकारात्मक असणार की सकारात्मक ये मालिका पाहिल्यावरच समजणार आहे. त्यामुळे याबाबतची उत्सुकता अजून तरी थोडे दिवस ताणून धरणार आहे. या नवीन मालिकेसाठी अभिनेत्री विद्या सावळे आणि त्यांच्या दोन्ही मुलींचे खूप खूप अभिनंदन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button