
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला अभिनेता कुशल बद्रिके सध्या एका अडचणीत सापडला आहे. रान बाजार या बहुचर्चित वेब सिरीजची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. अशात कुशलने देखील यावर भाष्य केलं मात्र ते आता त्याच्याच अंगाशी आल्याचं दिसत आहे. विनोदी कलाकार कुशल बद्रिके हा रान बाजार या सिरीज विषयी एक कौतुकाची पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने म्हटलं होतं की, “रान बाजार” एक कमाल वेब सिरीज. वेब सिरीजची टिपिकल गणितं मोडत, समाजाच आणि राजकारणाच वास्तव चित्र दाखवणारी ही सिरीज “कथेच्या नायकातल, अती-सामान्यपण, आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत रहाते”. “System नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते” हेच खर.

पुढे यातील काही कलाकारांची आणि दिग्दर्शकांची नावे घेत त्याने लिहिलं आहे की, “अभिजीत पानसे, तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार ह्यांचा भाराऊन टाकणारा परफॉर्मन्स ह्या सिरीजचा आत्मा ठरतो. खरोखर मला ही वेब सिरीज खुप आवडली नक्की बघा “रान बाजार” प्लॅनेट मराठीवर. आणि जाता जाता….. “ते कुंडी लगालो सय्यां” गाण काहीच्या काही केलय.” आता यामध्ये कुशलने एक मोठी चूक केली आहे यामध्ये त्याने ज्या गोंडस आणि सुंदर अभिनेत्रीला जास्त ट्रोल केलं गेलं. जिच्याबरोबर त्याने पांडू या चित्रपटात काम केलं अशा प्राजक्ता माळीचं नाव त्याने यामध्ये लिहिलंच नाही. यावरून काल अनेक माध्यमांवर आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या झळकू लागल्या. अशात एका न्युज चायनलने ” कुशल बद्रिकेकडून तेजस्विनी पंडित ते ‘ Raanbazaar’ दिग्दर्शकाचं तोंडभरून कौतुक, पण प्राजक्ता माळीसाठी एक शब्दही नाही…” अशा मथळ्यात बातमी छापली. याचं स्क्रीनशॉट काढून कुशलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तो पोस्ट केला आहे. त्यात कुशल बद्रिके काय म्हणाला ते सविस्तर पाहुयात..

तसेच मजेशीर असं कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ” मी समस्त news media आणि विशेष प्राजक्ता माळी चे चाहते यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायच चुकून राहिल. प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीण सुद्धा आहे, तुमच्या ह्या बातमीमुळे आता ती बहुतेक “दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटण, तेल वगैरे भेट म्हणुन पाठवते ते पाठवणार नाही” तुम्हाला त्याचं पाप लागेल. आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तु मस्त काम केलस यार. तुला खरचं सॉरी म्हणतो.” आता यावर प्राजक्ताने देखील कुशलला ठीक आहे रे असं होतं कधी कधी गडबडीत चुकून मी समजू शकते. असं म्हटलं आहे. रान बाजार सिरीज सुरू आहे अनेक प्रेक्षक ती आवडीने पाहात देखील आहेत. मात्र माध्यमांमध्ये सतत काही ना काही या विषयी चर्चा होतंच आहे.