भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम म्हणून सर्व परिचित असलेला कलाकार चला हवा येऊ द्या मध्ये त्याचा अभिनयाने मंचावर खरी मजा आणतो. पण इथवर येण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर भाऊ कदम आपल्या भावासोबत पान टपरी चालवायचा. तेथे येणाऱ्या मित्रांसोबत तो माजामस्करी करत वेगवेगळे हावभाव करून दाखवायचा. मित्रांच्या म्हणण्यावरूनच त्याने अभिनयक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला अनेक नाटके केली पण झी वाहिनीच्या “फू बाई फू” कार्यक्रमामुळे तो चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला.

भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे होते. कोणाचंही मन दुखावेल असं काम कधीच आपल्याकडून झालं नसल्यच ते बोलतात. ममता भालचंद्र कदम ह्या भाऊ कदम यांच्या पत्नी. याना ४ मुले आहेत. मृण्मयी, संचिता, समृद्धी आणि आराध्य अशी त्यांची नावे. त्यापैकी मृण्मयी कदम ही त्यांची थोरली मुलगी व्यवसाय क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे. मृण्मयी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे शिवाय तिचे युट्युब चॅनल देखील आहे. तिच्या या व्हिडिओजना चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळताना दिसते. मृण्मयीने एन जी बेडेकर ऑफ कॉमर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे निश्चितच याच क्षेत्रात तिनं करिअर करायचं ठरवलं आहे. तीच स्वतःच युट्यूब चायनल देखील आहे. त्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. “TA रुंध्या” हा नावाने मृण्मयीने स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. ज्यात विविध प्रकारचे हेअर बो तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तिच्या ह्या हेअर बो ला चांगल्या प्रकारे मागणी देखील आहे.

“हेअर बो” हा व्यवसाय देखील असू शकतो ह्याच अनेकांना आश्चर्य वाटेल. हा हटके पण छोट्या रूपातला व्यवसाय असला तरी आजकालच्या स्टाईलिश दुनियेत याला खूप डिमांड आहे. फॅशन आणि मॅचिंगच्या जमान्यात मुली आणि महिला देखील हेअर बो प्राधान्य देतात. लहान मुलीं तर स्टाईलिश हेअर बो साठी हट्ट करताना पाहायला मिळतात. आज हा व्यवसाय छोटा वाटत असला तरी पुढे जाऊन ह्याला खूप मोठी डिमांड येणार आहे. आपल्या छोट्या बहीण भावंडांसोबत मृण्मयी वेगवेगळे व्हिडीओ बनवत असते. ह्या व्हीडीओजना चांगले व्हीव्हज देखील मिळतात. मृण्मयीला आपल्या वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात देखील काम करण्याची आवड आहे. परंतु आधी तिने आपले शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिनयाची संधी तिच्यासाठी आली तर यात ती नक्की काम करेल असं ती म्हणते. भविष्यात अशी संधी मिळाल्यास मृण्मयी अभिनय क्षेत्रात नक्की चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे. असो मृण्मयी कदम हिला तिच्या हटके व्यवसायात यश मिळो आणि पुढे जाऊन ती अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करेल ह्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा…